निर्माता : विजय गलानी, सुनील ए. लुल्ला
दिग्दर्शक : अनिल शर्मा
गीत : गुलजार
संगीत : साजिद-वाजिद
कलाकार : सलमान खान, झरीन खान, सोहेल खान, लिसा, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ
रिलीज डेट : 22 जनवरी 2009
---
लढवय्या सैनिकांखेरीज, मराठा सैन्यातील एक महत्वाचा घटक म्हणजे पेंढारी आणि बाजारबुणगे. या लोकांच्या हातात ठराविक हत्यार असे नसते. एकदा मुख्य सैन्याने एखादा प्रदेश काबीज केला की त्या प्रदेशात लूटमार करणे हे या लोकांचे काम असते. घराच्या कड्या, कुलपे, बिजागर्यांपासून ते साठवून ठेवलेले धान्य यापर्यंत सर्व गोष्टींची हे लूट करतात. त्यांना पगार मिळत नाही पण मिळालेल्या लूटीत वाटा मिळतो. पण या पेंढार्यांनीही एक काळ गाजवला आहे. इंग्रजांविरोधात अनेक ठिकाणी सुरवातीचा लढा या पेंढार्यांनीच उभारला होता. त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून सलमानने स्वतः वीरची कथा लिहिली आहे.
यातील वीर हा पेंढारी युवक आहे. आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी तो इंग्रजांविरोधात लञढतो आहे. त्यातच माधवगडच्या राजाविरोधात तो लढतो आहे. या राजाने ब्रिटिशांशी हातमिळवणी करून पेंढार्यांना फसवले होते. शिवाय वीरच्या वडिलांनाही मारले होते.
त्यामुळे वीरला त्याचा बदलाही घ्यायचा आहे. पण वीरची गाठ माधवगडच्या राजकुमारीशी पडते आणि तो त्याचे ह्रदय तिला देऊन बसतो. आता प्रेम की कर्तव्य यापैकी वीर कोणाला निवडतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.