Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वॉंटेड

वॉंटेड सलमान खान
बॅनर : सहारा वन मोशन पिक्चर्स, एस के फिल्म्स इंटरप्राइज़ेस
निर्माता : बोनी कपूर
दिग्दर्शक : प्रभुदेवा
संगीत : साजिद-वाजिद
कलाकार : सलमान खान, आयशा टाकिया, महेश मांजरेकर, प्रकाश रा
रिलीज डेट : 18 सप्टेंबर 2009

वॉंटेड या वर्षातील बड्या चित्रपटांपैकी एक आहे. सलमान खानच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्कंठा लागली आहे. सलमान बर्‍याच वर्षांनी पुन्हा एकदा या चित्रपटातून एक्शन भूमिकेत दिसणार आहे.

राधे (सलमान खान) पैशांसाठी काहीही करायला तयार आहे. पण आपल्या अटींवर. ज्याच्याशी त्याची दोस्ती असेल त्याच्यासाठी तो जीवही देईल. दिलेले वचन पाळणे हा त्याचा धर्म आहे. राधे व्यवसायाने शूटर आहे. गॅंगस्टर गनी भाईच्या ( प्रकाश राज) शत्रूशी तो भिडतो. एकेकाला मारत मारत तो गनी भाईचे शत्रू कमी करतो पण स्वतःचे मात्र वाढवतो.

इकडे जान्हवी (आयेशा टाकिया) त्याच्यावर प्रेम करतेय. जान्हवी साधी-भोळी मुलगी आहे. इन्स्पेक्टर तळपदेची नजर (महेश मांजरेकर) तिच्यावर असते. पण राधेलाही ती आवडतेय हे त्याला माहित नाहीये. तळपदेला जे पाहिजे ते तो मिळवतोच. मग पैसा असो वा स्त्री.

IFM
IFM
गोल्डन गॅंग, दादा पावले गॅंग या सगळ्या टोळ्यांना मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठी हे सगळे परस्परांशी भिडले आहेत. त्यांच्या मार्गात येणारा मृत्यूच्या भेटीस जात असतो. मुंबईचे पोलिस कमीशनर अशरफ खान हे गुंडाराज संपविण्याचा विडा उचलतात. अनेकांना पकडतातही. गॅंगस्टर परस्परांत लढत असतातच, आता पोलिसही त्यांच्याशी लढू लागतात. त्यामुळे स्थित चिघळते. यातच 'राधे' मोस्ट वॉंटेड बनतो. टोळीवाले त्याला मारायला उठलेले असतात, दुसरीकडे पोलिसही त्याच्या मागे लागलेले असतात. यात पुढे काय होते, ते पडद्यावरच पहायला मजा येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi