Article Film Preview Marathi %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%9f %e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a5%80 109070800069_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संकट सिटी

संकट सिटी
IFMIFM
निर्माता : अनुभव सिन्हा
दिग्दर्शक : पंकज आडवाणी
संगीत : रंजीत बारोट
कलाकार : के.के. मेनन, रिमी ‍सेन, अनुपम खेर, चंकी पांडे, दिलीप प्रभावळकर, राहुल देव, यशपाल शर्मा, हेमंत पांडे, वीरेन्द्र सक्सेना, संजय मिश्रा.

गुरू (के. के. मेनन) व गणपत ( दिलीप प्रभावळकर) भुरटे चोर आहेत. ते चोरीत भागिदारही आहेत. शिवाय चोरीच्या कामातही. गुरू कार चोरतो आणि गणपत त्याचे रूपडे बदलून टाकतो. त्यानंतर कार विकून ते रक्कम निम्मीनिम्मी वाटून घेतात.

एकदा गुरूला मर्सिडीज कार दिसते. तो कार चोरतो. त्यात एक कोटी रूपये ठेवले असतात हे नंतर कळतं. ही कार गॅंगस्टर फौजदाराची (अनुपम खेर) आहे.

webdunia
IFMIFM
मर्सिडीज ते सुलेमान सुपारी यास ( राहूल देव) विकण्याचा प्रयत्न करतात. कार पाहताच ती फौजदाराची आहे हे त्याला कळते. तो फौजदाराला सगळं सांगून टाकतो. फौजदार दोघांनाही बोलवतो. पण या काळात अपघातात गणपतची स्मृती जाते. गाडीतले एक कोटी रूपयेही त्यानेच लपवून ठेवलेले असतात. पण आता त्यालाच ते कुठे ठेवले आठवत नाही. मधल्या काळात गुरूला मोना (रिमी सेन) भेटते. दोघेही यापूर्वी एकत्र चोरी करत असतात. दोघेही आता एक कोटी रूपये कसे बसे जमवतात. पण हरवून बसतात. अशा अनेक मजेदार घटना घडत जातात. त्यामुळे पुढे काय घडणार याची उत्सुकता ताणली जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi