rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सी कंपनी

सी कंपनी
IFMIFM
निर्माता : एकता कपूर, शोभा कपू
दिग्दर्शक : सचिन यार्ड
संगीत : आनंद राज आनंद, बप्पा लाहिर
कलाकार : तुषार कपूर, अनुपम खेर, राजपाल यादव, रायमा सेन, मिथुन चक्रवर्ती, (विशेष भूमिकांमध्ये महेश भट्ट, एकता कपूर, करण जोहर, संजय दत्त, सेलिना जेटली)

'सी कंपनी' या चित्रपटाचे कथानक तीन मित्रांवर गुंफण्यात आले आहे. तुषार कपूर क्राईम रिपोर्टर आहे, रिटायर्ड अकाउंटत श्री. जोशी व लंबोदर (राजपाल यादव) यांच्यात चांगली मैत्री असून त्यांना एकमेकाच्या सोबत राहायला आवडते. तिघेही आपापसात मनातील गोष्टी व्यक्त करून मनावरील दडपण कमी करत असतात.

एक दिवशी आपल्या समस्येवर ताबा मिळवण्यासाठी ते एक गंमत करतात. त्यांना या गमतीतून कोणाचे नुकसान करायचे नसते. मात्र, जे न व्हायचे तेच होते. कालांतराने त्यांच्या गमतीचे रूपांतर एका जबरजस्त बातमीत होते.

एवढे होऊन ही गोष्ट थांबत नाही. घगटने मागून घटना घडतच जातात व त्या तिघांच्या बाबतीत संपूर्ण देशात चर्चा होते. एकंदरीत परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जाते. त्यांच्याकडे एकही उपाय शिल्लक राहत नाही. मात्र आश्चर्य एकच की, एवढे 'रामायण' होऊन ही त्यांनी कोणीच ओळखत नाही. आहे की नाही रोमँटिक !

तिघं मित्रांचे काय होते? त्यांनी केलेल्या गमतीचे जबरदस्त बातमीत रूपांतर कसे होते? हे तर 'सी कंपनी'ला अडीच- तीन तासाची 'कंपनी' दिल्यानंतरच म्हणजे 'सी कंपनी' हा चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi