Article Film Preview Marathi %e0%a4%b8%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88 108112500003_1.htm

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सॉरी भाई!

सॉरी भाई
IFM
निर्माता - वासु भगनानी, ओनीर
दिग्दर्शक - ओनीर
संगीत - गौरव दयाल, विवेक फिलिप
कलाकार - शरमन जोशी, चित्रांगदा सिंह, संजय सूरी, शबाना आजमी, बोमन ईरानी

व्यवसायाने वैज्ञानिक असणारा सिद्धार्थ माथुर हा लाजरा-बुजरा युवक आहे. त्याचा मोठा भाऊ 'हर्ष' मॉरीशसमध्ये लग्न करणार असतो. त्याच्या लग्नासाठी सिद्धार्थ आपल्या आई-वडिलांना घेऊन मॉरीशसला जातो. हर्षच्या या निर्णयावर त्याची आई नाराज असते. मॉरीशसमध्ये पोहोचल्यावर हर्ष ‍आलिया या आपल्या नियोजी‍‍त पत्नीची भेट त्यांना घालून देतो.

webdunia
IFM
हर्ष कामात खुपच व्यस्त असतो आणि लग्नापूर्वी तो आपली सगळी कामे आटोपती घेतो. घरच्यांना मॉरीशस दाखविण्याची जबाबदारी तो आलियाला देतो. पण, आलीयावर नाराज असल्याने आई सिद्धार्थबरोबर फिरत असते. हर्ष आपणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे आलियाला वाटू लागते. आणि ती सिद्धार्थकडे आकर्षित होते. सिद्धार्थही तिच्याकडे आकर्षित होतो पण, तो आपणावर आवर घालण्याचा प्रयत्न करतो.

webdunia
IFM
आलिया जवळीक वाढवते तेव्हा सिद्धार्थही तिच्या प्रेमात पडतो. सिद्धार्थची आईला याबाबत संशय येतो. आणि हे सर्वांना कळते तेव्हा माथुर कुटूंबात वादळ येते. चित्रपट रोमांस आणि कॉमेडीने भरपूर आहे. चित्रपटात असे अनेक क्षण आहेत ज्यावेळी पोटधरून हसू येते आणि काहीवेळा डोळ्यातून पाणीही येते.


Share this Story:

Follow Webdunia marathi