Article Film Preview Marathi %e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9c%e0%a5%85%e0%a4%95 108082900008_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हायजॅक

हायजॅक
जगाला नैतिकतेचे डोस पाजणार्‍या भारतीय जनता पक्षाचे एकेक नेते नवनवीन वादात अडकत आहे. ताजा वाद आहे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासंदर्भातला. इंदूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या जावडेकरांची मद्याचे चषक हातात घेताना व चीअर्स करतानाची छायाचित्रे स्थानिक वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केल्याने भाजप चांगलाच अडचणीत आला आहे.

त्यांच्या या छायाचित्रांवरून सध्या मध्य प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले असून, कॉग्रेसनेही जावडेकरांविरोधात टीकेची झोड उडवली आहे.

मंगळवारी जावडेकर इंदूरमध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते, कार्यक्रम आटोपून ते हॉटेलमध्ये परतल्यावर तेथे शॅंपेन पार्टी झाली. यात शॅंपेनची बाटली उघडतानाचा फोटो येथील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुरुवातीला हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आता हे प्रकरण चांगलेच पेटले आहे.

यापूर्वी, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संजय जोशी हेही एका सेक्स कॅंडलच्या सीडी प्रकरणात अडकले होते. तर दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा उत्तराधिकारी म्हणून ज्याचे नाव घेतले जात होते, ते त्यांचे पुत्र राहुल महाजनही अमली पदार्थ सेवन करताना आढळून आल्याने भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका प्रदेश कॉग्रेस प्रवक्ते मानक अग्रवाल यांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi