Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अय्या: चित्रपट परीक्षण

अय्या: चित्रपट परीक्षण
PR
PR
बॅनर : वायकॉम १८ मोशन पिक्चर्स, एकेएफपीएल प्रॉडक्शन्स
निर्माता : अनुराग कश्यप, गुनीत मोंगा
दिग्दर्शक : सचिन कुंडलकर
संगीत : अमित त्रिवेदी
कलाकार : रानी मुखर्जी, पृथ्वीराज सुकुमारन
रेटिंग : २.५/५
बहुतांश आई-वडिलांना मुलींच्या लग्नाची चिंता असते. लग्न जुळल्याबरोबर खूप मोठे ओझे हलके झाल्याचे त्यांना भासत असते. लग्नाअगोदर पाहण्याचा कार्यक्रम म्हणजे मुलीची अग्निपरिक्षाच असते.

मुलांकडील मंडळी हर तर्‍हेचे प्रश्न विचारतात, बघतात व विचारपूस झाल्यानंतर नाकारतात. एखाद्या मुलीस वारंवार नाकारल्यानंतर आजूबाजूचे कुजबूज करू लागतात. तुझी काय इच्छा आहे, असे मुलीस कधीच विचारल्या जात नाही. लग्नासारख्या आयुष्यावर परिणाम करणार्‍या निर्णयात मुलीचे मन विचारातच घेतल्या जात नाही. या विषयाच्या भोवती 'अय्या' चे कथानक फिरते. वाचताना या गोष्टी गंभीर वाटतात, मात्र चित्रपटात हलक्या-फुलक्या अंदाजात हे सादर करण्यात आले आहे.

webdunia
PR
PR
मीनाक्षी देशपांडे (रानी मुखर्जी) निम्न मध्यमवर्गीय वर्गातील आहे. तिच्यासाठी वर शोधण्याचा द्राविडी प्राणायाम आई-वडील करत आहेत. मीनाक्षी सुंदर आहे मात्र भक्कम हुंडा देण्याची क्षमता नसल्याने तिचे लग्न जुळत नाहीये.

मीनाक्षी आर्ट कॉलेजच्या ग्रंथालयात काम करते व तेथे अभ्यास करणारा विद्यार्थी सूर्यास (पृथ्वीकुमार) हृदय देऊन बसते. सूर्या तमिळ मुलगा असून त्याचा गंध तिला चांगलाच भावतो. हे एकतर्फी प्रेम असते.

इकडे तिला माधव नावाचा मुलगा पसंत करतो मात्र तिने अद्यापपर्यंत सूर्याकडे प्रेम व्यक्त केलेले नाही. मीनाक्षी आपल्या हृदयातील गोष्ट सांगू शकते काय? सूर्या तिचा स्वीकार करेल? तिला माधवसोबत लग्न करावे लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये मिळते.

कथानकाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास 'अय्या' चे कथानक साधारण व छोटेसे आहे. कथानकात काहीच नावीन्य नसून रोचक वळणही नाहीत. संपूर्ण भिस्त सादरीकरणावर असून दिग्दर्शक सचिन कुंडलकरने कथा-पटकथा-संवाद या सर्वच जबाबदार्‍या पेलल्या आहेत.

चित्रपटात सचिनमधील लेखक दिग्दर्शकावर वरचढ झाला आहे. छोट्याशा गोष्टीस त्याने खूपच खेचले आहे. प्रेक्षक चित्रपटाचा शेवट होण्याची प्रतीक्षा करून कंटाळून जातो. चित्रपटात चांगल्या संपादनाची आवश्यकता आहे.

webdunia
PR
PR
सचिनने काही चांगले दृश्य पेरण्यात यश मिळवले असून ते हृदयस्पर्शी झाले आहेत. रानी मुखर्जी चित्रपटाची जाण असून मीनाक्षी या मराठमोळ्या मुलीची भूमिका तिने सशक्तपणे उभी केली. तिच्या चेहर्‍यावरील भाव पाहण्यासारखे आहे. पृथ्वीराजचे पात्र फक्त क्लायमॅक्सच्या वेळीच काही संवाद बोलते, त्याचा पडद्यावरील वावर उत्तम आहे.

इतर कलाकारांनी चांगला अभिनय केला. अमित त्रिवेदींचे संगीत साधारण आहे. वैभवी मर्चण्टचे नृत्यदिग्दर्शन उत्तम आहे. राणीचे लावणी व ऐंशीच्या दशकात दक्षिण भारतीय चित्रपटात करण्यात येणारे नृत्य पाहण्यालायक आहे.

एकंदरीत 'अय्या' चांगला व वाईटातील मध्यबिंदू साधत साधारण मनोरंजक चित्रपट झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi