Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपट परीक्षण : दमदार अक्षयचा जानदार ‘गब्बर इज बॅक’

चित्रपट परीक्षण :  दमदार अक्षयचा जानदार ‘गब्बर इज बॅक’
, सोमवार, 4 मे 2015 (12:44 IST)
स्पेशल 26, हॉलिडे आणि बेबीसारखे दमदार सिनेमे दिल्यानंतर ‘गब्बर इज बॅक’ हा सिनेमा कसा असेल, याची उत्सुकता तुम्हाला असेलच. गब्बर हा सिनेमा तमिळ सिनेमा रामणाचा रीमेक आहे. 
 
‘गब्बर इज बॅक’ हा सिनेमा खरंतर एक वन मॅन आर्मी आहे. दिग्दर्शक क्रिशचा हा दिग्दर्शनात डेब्यू असलेला सिनेमा आहे. अक्षयकुमारचं या सिनेमातलं नाव जरी गब्बरचं असलं तरी त्याचे कारनामे हिरोचे असतात. त्याच्या भूमिकेचा आणि शोलेमधल्या गब्बरचा काहीही संबंध नाही. इन शॉर्ट good v/s evil अशा बॅकग्राउंडवरचा हा सिनेमा आहे. आम्ही जसं तुम्हाला म्हटलं की हा एक वन मॅन आर्मी असा सिनेमा आहे. देशातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी हा गब्बर पुढाकार घेतो. भ्रष्ट लोकांचा नायनाट करायचा असा निश्चय करतो. भ्रष्टाचारात सामील असलेल्या प्रत्येकाला तो भर चौकात नेऊन संपवतो. अशातच एंट्री होते ती सुमन तलवार या नटाची. गब्बर आणि सिनेमाचा खरा व्हिलन सुमन तलवार जेव्हा आमने सामने येतात तेव्हा काय घडतं.

webdunia
याचबरोबर अभिनेता सुनील ग्रोवरनंही यात त्याच्या नेहमीच्या जोनरपासून खूपच हटके भूमिका केली आहे. या सिनेमात त्यानं एका पोलीस अधिकार्‍ाची भूमिका केलीये. गुत्थी या त्याच्या टीपीकल रोलमधून तो फायनली बाहेर पडलाय. अभिनेत्री श्रुती हसननं या सिनेमात जे काही केलंय ते खूपच साइडट्रॅक वाटतं. खरंतर तिला सिनेमात अभिनयासाठी काही स्कोपच ठेवला नाहीये. श्रुतीनं तिच्या करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूवनं आता विचार करायला हवा. एवढंच नाहीतर सिनेमे स्वीकारतानाही जपून आणि विचार करुनच पाऊल उचलावं.

Share this Story:

Follow Webdunia marathi