Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जज्बा : चित्रपट परीक्षण

जज्बा : चित्रपट परीक्षण
, शनिवार, 10 ऑक्टोबर 2015 (17:53 IST)
संजय गुप्ता दिग्दर्शित ‘जज्बा’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. या सिनेमाद्वारे ऐश्वर्या राय बच्चनने सिनेसृष्टीत कमबॅक केले आहे. ऐश्वर्याने या सिनेमात अनुराधा वर्मा नावाच्या वकिलाची भूमिका वठवली आहे. तिच्या मुलीचे अपहरण झालेले असते. सिनेमात इरफान खानने एका सस्पेंडेड पोलीस ऑफिसरची भूमिका वठवली आहे. 
 
सिनेमाची सुरुवात अनुराधा (ऐश्वर्या राय बच्चन) च्या मुलीच्या अपहरणाने होते. किडनॅपर अनुराधाला एका गुन्हेगाराचा खटला लढण्यास सांगतात. त्या गुन्हेगारावर महिलेवर बलात्कार आणि तिच्या हत्येचा आरोप असतो. सिनेमात इरफान खानने योहन ही व्यक्तिरेखा वठवली आहे. तो अनुराधाचा कॉलेज फ्रेंड आणि सस्पेंडेड पोलीस ऑफिसर आहे. आपल्या मुलीच्या शोधासाठी अनुराधा योहानची मदत घेते. सिनेमात अनेक रंजक सिक्वेन्सेस आहेत. मात्र लाउड बॅकग्राउंड साउंड सिनेमाची मजा कमी करतो. ऐश्वर्याचा अभिनयसुद्धा खूप लाउड झाला असून तिच्या व्यक्तिमत्त्वाला तो साजेसा नाहीये. सिनेमाचे मुख्य आकर्षण हे ऐश्वर्याचे पुनरागमन असून प्रेक्षकांना थिएटरकडे वळवणारे आहे. सिनेमा संपूर्ण इरफानच्या खांद्यावर आहे. गेल्या आठवडय़ात रिलीज झालेल्या ‘तलवार’ या सिनेमाप्रमाणेच हा सिनेमासुद्धा इरफानच्या अवतीभोवती फिरतो. 
 
सिनेमातून इरफानकडे दुर्लक्ष केल्यास प्रेक्षकांना थिएटरमध्ये खिळवून ठेवणारे दुसरे कोणतेही कारण नाही. सिनेमात जॅकी श्रॉफ यांनी राजकारण्याची तर सिद्धार्थ कपूरने त्यांच्या मुलाची भूमिका वठवली आहे. सिनेमात ड्रग अँडिक्ट सिद्धार्थने अशा तरुणीच्या बॉयफ्रेंडची भूमिका वठवली आहे, जिची बलात्कारानंतर हत्या करण्यात येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi