Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुर्देवाचे 'दशावतार'

दुर्देवाचे 'दशावतार'

वेबदुनिया

IFMIFM
निर्माता : आस्कर रविचंद्र
दिग्दर्शक : के.एस. रविकुमा
गीत : समीर
संगीत : हिमेश रेशमिय
कलाकार : कमल हासन, असिन, मल्लिका शेरावत, जया प्रद
* डब * यू सर्टिफिकेट
रेटिंग : 2/5

कमल हसनला वेगवेगळ्या भूमिकांचा सोस असला तरी त्यात त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या नव्या अवताराचेचे अप्रुप तेवढे उरते आणि कमलचा अभिनय मात्र त्यावर 'कलम' होतो. त्यामुळेच कमल अभिनेता वाटण्यापेक्षा बहुरूपी जास्त वाटतो. 'दशावतार' हाही बहुरूपी कमल हसनचे विविध 'अवतार' दाखविणारा चित्रपट आहे. यात हिरो, व्हिलन आणि सगळ्या सहाय्यक भूमिका म्हणजे सबकुछ कमल हसन आहे.

बारावे शतक ते २१ वे शतक असा याच्या कथेचा परीघ आहे. शिव आणि विष्णू समर्थकांची लढाई हा त्याचा विषय २१ व्या शतकापर्यंत खेचून आणला आहे. त्याला काहीही तार्किक आधार नाही. २१ व्या शतकात २००४ मध्ये अमेरिकेत लाखो लोकांचे प्राण घेऊ शकेल असा व्हायरस तयार करण्यात येतो. अनेक देश हा व्हायरस मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण गोविंद नावाच्या एका भारतीय शास्त्रज्ञाला हे कळते, तेव्हा तो हा व्हायरस घेऊन भारतात पळ काढतो. त्याच्या मागोमाग खलनायकही येतो. मग 'टॉम अँड जेरी' चा खेळ सुरू होतो.

webdunia
IFMIFM
यातून कमल हसनला नेमके काय सांगायचे आहे, काही कळत नाही. कमलवरच पूर्ण चित्रपट केंद्रिभूत झाल्याने त्याचे ते अतिदर्शन कंटाळवाणे ठरते. असीन चित्रपटाची नायिका आहे. ती सतत बडबडताना दाखवली आहे. तिची बडबड असह्य होते. यात एक्स सीआयए एजंट, शास्त्रज्ञ, बंगाली व्यक्ती अशा विविध रूपात कमल येतो. त्यातल्या काही भूमिका बर्‍या आहेत. पण बाकी सगळा उजेडच आहे. असीन चीड आणते. मल्लिका शेरावतची छोटी भूमिका यात आहे. जयाप्रदाने केवळ कमल आहे, म्हणून यात भूमिका केल्याचे जाणवते.

चित्रपटावर प्रचंड पैसा खर्च करण्यात आला आहे. एक्शन दृश्ये छान आहेत. हिमेश रेशमियाच्या संगीतात दम नाही. एकुणात काय हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या दुर्देवाचे 'दशावतार' आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi