Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बजरंगी भाईजान : समीक्षा

बजरंगी भाईजान : समीक्षा
, शुक्रवार, 17 जुलै 2015 (16:27 IST)
“सलामान खानच्या चाहत्यांना हा प्रश्न कधी विचारू नये की त्याचे चित्रपट कसे होते. कारण त्यांच्यासाठी सलमानाचे चित्रपट म्हणजे त्यांच्या निष्ठेचा प्रश्न जास्त असतो. या वेळेस ईदची सर्वात मोठी भेट म्हणजे बजरंगी भाईजान आहे. या चित्रपटातील त्रुटी काढायला निघालो तर बर्‍याच मिळतील. पण सध्या आम्ही आपले लक्ष्य केंद्रित करू ते निर्माता (सलमान खान आणि राकलाइन वेंकटेश)च्या खात्यात एकापुढे किती शून्य जमा होणार आहे.”
 
भारत-पाकिस्तानच्या संबंधांवर तयार चित्रपटांमध्ये नेहमी शत्रुता आणि वैमनस्य जास्त दाखवण्यात येते. या चित्रपटात पाकिस्तानची जनता बेकायदेशीररीत्या त्यांच्या देशात आलेल्या एका हिंदुस्तानीशी प्रेम करताना दाखवण्यात आले आहे. तर मग आपण असू म्हणू शकतो की हे दोन्ही देशातील संबंधांमध्ये होणार्‍या परिवर्तनाची सुरुवात आहे.  
 
सहा वर्षाची एक मुलगी शाहिदा उर्फ मुन्नी (हर्षाली मल्होत्रा)‍जी बोलू शकत नाही ती भारतात येऊन हरवली आहे. तिला पवन कुमार चतुर्वेदी उर्फ बजरंगी (सलमान खान)ला आधी मजबूरीत नंतर प्रेमाखातर आपल्या जवळ ठेवावे लागते. या बजरंगीला एक कट्टर हिंदुस्तानीची मुलगी रसिका (करीना कपूर)शी प्रेम झाले असते आणि त्याला लग्नाअगोदर मुन्नीला तिच्या आई वडिलांशी भेट घालून द्यायची असते. बगेर पासपोर्ट-विजा तो त्या मुलीला आपल्या आई वडिलांशी भेटवतो. या दरम्यान चांद मोहम्मद (नवाजुद्दीन सिद्दकी) एक घरगुती टाइपाचा स्ट्रिंगर त्याची मदत करतो. नवाजुद्दीनचा अभिनय फारच सहज आहे. सलमान खानची चमक देखील त्याला फिकी करून शकत नाही.   
 
webdunia
आधी मनमोहन देसाई यांच्या चित्रपटात असे होत होते की, दर्ग्यावर वर जा आणि डोळ्यातील ज्योत परत आण. नमाज वाचा आणि हरवलेल्या वडिलांना मिळवा. चमत्कार्‍यांच्या या कडीला दिग्दर्शक (कबीर खान)ने पुढे वाढवले आहे. दर्ग्यात जाऊन आईचे क्लू मिळणे आणि मुलगी भारतातील एका दर्ग्यावर आलेली आहे म्हणून तिचे आवाज परत येणेपण गरजेचे होते. सलमान स्टाईल लटके-झटके असणारे गाणे, त्याच्याच स्टाइलची मारपीट आणि थोड्या झोलझालनंतर देखील चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवते. या चित्रपटात अॅक्शन-इमोशन बरोबरीने आहे. बर्‍याच दिवसांनंतर असे चित्रपट आले आहे जे पूर्ण परिवारासोबत बसून बघू शकता. कुठलेही वयस्क विनोद या चित्रपटात नाही आहे. हे कॉमेडी चित्रपट नाही आहे पण सहज हास्याची यात कमीही नाही आहे.  
 
बरेच दृश्य हृदयापर्यंत जातात. खास करून शाहिदा उर्फ मुन्नीचे काही न म्हणता बजरंगीला पकडून सांगणे की ती एकटी पाकिस्तानात जाणार नाही. क्रिकेट सामन्यात पाकिस्तानच्या विजयाच्या वेळेस शाहिदाचे ताळी पिटणे आणि एका लहान मुलाचे म्हणणे, ‘काय करत आहे मुन्नी, हा संघ आपला नाही आहे.’
 
आता थोडे पोलिटिकलची गोष्ट करावी तर पवन कुमार चतुर्वेदीचे वडील शाखा प्रमुख दाखवण्यात आले आहे. हे मात्र संयोग आहे...। 
 
बॅनर : इरोज इंटरनेशनल, सलमान खान फिल्म्स, कबीर खान फिल्म्स 
निर्माता : सलमा खान, सलमान खान, रॉकलाइन वेंकटेश
निर्देशक : कबीर खान
संगीत : प्रीतम चक्रवर्ती
कलाकार : सलमान खान, करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, हर्षाली मल्होत्रा, ओम पुरी, शरत सक्सेना
सेंसर सर्टिफिकेट : यूए * 2 तास 39 मिनिट 19 सेकंड्स 
रेटिंग : 4/5 

Share this Story:

Follow Webdunia marathi