Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमानची जोरदार ‘किक’

सलमानची जोरदार ‘किक’
, शनिवार, 26 जुलै 2014 (11:59 IST)
बॅनर : नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट, यूटीवी मोशन पिक्चर्स
निर्माता-निर्देशक : साजिद नाडियाडवाला
संगीत : हिमेश रेशमिया, मीत ब्रदर्स, यो यो हनी सिंह, डीजे एंजल
कलाकार : सलमान खान, जैकलीन फर्नांडिस, रणदीप हुडा, नवाजुद्दीन सिद्दकी, सौरभ शुक्ला, ‍मिथुन चक्रवर्ती, अर्चना पूरण सिंह, नरगिस फाखरी 

तो सुपरस्टार आहे आपल्या मनात धमाकेदार एण्ट्री घेतो ती दमदारपणे. त्याच्या अंदाजाने आपण स्तिमित होतो. तो भारावून टाकतो त्याच्या दिलखेच अदांनी. त्याच्या फाइट- अँक्शनमध्ये आपल्या मुठी आवळल्या जातात. त्याच्या विनोदावर आपण दिलखुलासपणे हसतो, त्याच्या डोळ्यात पाणी दाटून येतं तेव्हा आपल्यासमोरचं सारं काही धुरकटपणे दिसायला लागतं. त्याच्यामधला भन्नाटपणाची किक त्यामधलं झपाटलेपण आपल्यामध्ये इंजेक्ट करायला तो विसरत नाही. म्हणूनच दिल मे आता हूँ, समझ मे नही.
 
webdunia
सलमान, सलमान आणि सलमान. स्क्रीनवर दशांगुळे व्यापून राहणारा असा हा सलमान खान आहे. जय होच्या डिझास्टरनंतर भरारी घेण्यात सलमान बाजी मारतो का? याकडे सार्‍यांचं लक्ष होतं. पण यामध्ये सलमानने आपली त्यामधला जोश जुनून त्यामधला ऑसम अँटिटय़ूड त्यामुळे सलमानचे फॅन्सच नाहीत, तर त्याच्यासाठी नाकं मुरडणार्‍यांनी सिनेमा पाहिला तरी ते त्याच्यावर फिदा होतील. थोडक्यात सांगायचं तर, पैसा वसूल फिल्म आहे. आपण कथेकडे वळूया. पोलंडमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असणारी जॅकलिन फर्नांडिस तिच्या पहिल्या प्रेमाच्या असफलतेमधून सावरलेली नाही. त्याला ती विसरू शकलेली नाही. तिचे बाबा सौरभ शुक्ला, तिची आजी आणि बहीण हे जॅकलिनला आता त्या फेझमधून बाहेर पड आणि नव्याने आयुष्य सुरू कर हे सांगत असतात. अशा परिस्थितीत सौरभ शुक्लांच्या मित्राचा मुलगा पोलंडला येणार असतो, तो म्हणजे रणदीप हुडा. त्याच्यासोबत तिचं लग्न ठरणार, अशावेळी तिच्या आयुष्यात असलेला एक्स फॅक्टरबद्दल ती सांगू लागते आणि मग दिल्लीला तिच्या आयुष्यात आलेला देवीलाल, तिच्या मैत्रिणीचं लग्न, त्याला किक मिळावी, यासाठी तो काय काय फण्डे करतो. त्यामधली रंजकता ही खरंच अनुभवण्याजोगी आहे. दक्षिणेतला सुपरस्टार रवी तेजाचा किक नावाचाच सिनेमा 2009 साली हा सिनेमा आला होता. त्याचा रिमेक असलेल्या या किकला सलमान टच आहे. त्यामधला झपाटून टाकणारा अनुभव सलमानने दिला आहे. त्यामधलं शक्तिस्थान म्हणजे सरप्राइज एलिमेण्ट्स. सलमानने असे टिस्ट अँड टर्न करण्यात माहिर आहे असं वाटलं तरी त्याचं श्रेय जातं ते रजत अरोरा, किथ गोम्स, साजिद नाडियादवाला आणि चेतन भगत या चार लेखकांना. कारण त्यांनी या सगळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

युटीव्ही आणि साजिद नाडियादवालाने यावेळी हुशार खेळी करत स्क्रीप्टवर प्रचंड भर दिलेला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने हा हुकमी एक्का काढला आहे ते कमाल आहे. हा सिनेमा सलमानचा आहे, तो सुपरहिट आहे. त्याच्या अंदाजाला नव्याने ग्लोरिफाय करणारा हा डेव्हिल आहे. मसाला एण्टरटेनरची व्याख्या बदलणारा आणि सुपरहिट सिनेमाचे मापदंड बदलण्याची नांदी असणारा असा हा सिनेमा म्हणून याकडे पाहता येईल. थिएटरमधून बाहेर पडताना तुमच्याही मनात पैसा वसूल हे वाक्य असेलच पण वो दिल में आता है.. और दिमाग क्यूँ नही.. याचं आपापलं उत्तरही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

जय होच्या डिझास्टरनंतर भरारी घेण्यात सलमान बाजी मारतो का?