Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंघम रिटर्न्स : चित्रपट समीक्षा

सिंघम रिटर्न्स : चित्रपट समीक्षा
, सोमवार, 18 ऑगस्ट 2014 (12:13 IST)
रोहित शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट ‘सिंघम रिटर्न्‍स’ भारतीय स्वातंर्त्य दिन आणि सलग चार दिवस आलेल्या सुटय़ा यांचे औचित्य साधून प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे यावेळीस देखील अजय आणि रोहितची जुळून आलेली उत्तम केमेस्ट्री. रोहित शेट्टी म्हटले की हमखास 100 कोटी कमविणारे चित्रपट. रोहितच्या सिंघम पार्ट 1 ने देखील शंभरी गाठली होती. तसाच दुसरा सिंघम देखील आहे यात काही शंका नाही.
 
webdunia
या चित्रपटाची कहाणी यापूर्वी आलेल्या ‘सिंघम’ चित्रपटाप्रमाणेच असून मुंबई पोलीसमधील डीएसपी ‘बाजीराव सिंघम’वर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये सिंघम (अजय देवगण) गुन्हेगारांना सळो की पळो करताना दिसत आहे. भक्तगण जनतेला महाभ्रष्ट बाबा (अमोल गुप्ते) आणि त्याचे साथीदार मूर्ख बनवत असतात. सिंघम त्यांचा फर्दाफाश करण्यासाठी प्रयत्न करत असतो. या भोंदुबाबाच्या विळख्यातून जनतेला मुक्त करण्यासाठी सिंघमची भूमिका कशी असेल याविषयी संपूर्ण कथानक आहे. रोहित शेट्टीचे कार हवेत उडविणे, स्फोट होणे ही चित्रपटातील दृश्ये ओळखीची वाटतात. ‘सिंघम रिटर्न्‍स’चा पहिला भाग थोडा संथ असल्यामुळे प्रेक्षकांना थोडे कंटाळवाणे वाटू शकते. परंतु मध्यांतरानंतर चित्रपट अतिशय गतिवान होतो आणि प्रेक्षकांच्या मनावर पकड घट्ट करतो.
 
अजय देवगण या चित्रपटाचे आकर्षण असून अँक्शन सीनसाठी अजय अगदी परफेक्ट बसतो. तर चित्रपटामध्ये पाहिजे त्या प्रमाणात करिना कपूरला वाव मिळाला नाही. तिची अजय सोबतची केमेस्ट्री चांगली जुळली. परंतु डान्स आणि फक्त गाण्यातच तिला पाहण्याची मजा येत नाही. अमोल गुप्तेने खलनायकाची भूमिका जीव ओतून केली असून हे पात्र त्याच्यासाठीच बनविले गेले आहे. ‘सिंघम रिटर्न्‍स’ हा चित्रपट जबरदस्त अँक्शनपट असून सहयोगी कलाकरांनीही चांगली भूमिका निभावली आहे. रोहित शेट्टीसाठी एकदातरी हा चित्रपट बघावाच. 

Share this Story:

Follow Webdunia marathi