Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिरोपंती : चित्रपट समीक्षा

हिरोपंती : चित्रपट समीक्षा
, शनिवार, 24 मे 2014 (15:09 IST)
जॅकी श्रॉफने काम केलेल्या पहिल्या हिन्दी सिनेमाचे नाव होते हिरो. आता त्याच्या मुलाचे, टायगर श्रॉफचे, हिंदी चित्रपटात आगमन होते आहे म्हणून निर्मात्यांनी हिरोच्या जवळचे नाव शोधले ते म्हणजे हिरोपंती. पदार्पणात टायगरने अॅक्शन हिरो म्हणून काम चांगले केले आहे. बॉलीवूडमधील काही थकत चाललेल्या अॅक्शन हिरोंना आता पर्याय किंवा वारस टायगरच्या रूपाने मिळते असे दिसते. अॅक्शन हीरो म्हणून टायगर ठीक वाटला; पण त्याच्या अभिनयाला जॅकीची सर येत नाही. साबीर खानने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 'परूगू' या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. दाक्षिणात्य मारधाड यशस्वी चित्रपटांचे रिमेक करून गल्ला भरायचा ही बॉलीवूडची जुनी परंपरा आहे. 
 
हरियाणातल्या जाट आणि गुंड कुटुंबातील मुलीचे लग्न ठरलेले असते आणि ऐनवेळी मुलगी तिच्या बॉयफ्रेंडबरोबर पळून जाते. लाठ्याकाठ्या, बंदकी धावपळ होते. बॉयफ्रेंड काही सापडत नाही; पण त्याचे चौघे मित्र सापडतात. त्यात आपला हिरो असतो बबलू (टायगर श्रॉफ) प्रथम तो पकडायला आलेल्या सर्वांना शौर्याने चोप देतो; पण नंतर पकडला जातो. चौघांना डांबून ठेवले जाते. या तुरूंगात त्याला कळते की त्याचे एकतर्फी प्रेम असलेली बालिका डिंपी ही इथेच आहे व ती पळून गेलेल्या बालिकेची बहीण आहे. मग तो कैदेतून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुरूनातच राहून त्या लग्नघरात आपली डाळ कशी शिजले हे पाहतो. पळून गेलेल्या जोडीचा पाठलाग करण्यासाठी हे कैदी मित्र मदत करतात. एकीकडे पाठलाग व एकीकडे नवीन प्रेम जुळवणे हे चित्रपटाच्या शेवटापर्यंत चालते. हिन्दी चित्रपट म्हणजे हिरोची अडथळ्याची शर्यतच असते.  
 
याच प्रक्रारातला हा सिनेमा आहे. आपल्याला यातून मिळाले काय तर टायगर श्रॉफसारखा अॅक्शन हिरो, डिंपो (कीर्ती सॅनन) सारखी सुंदर हिरॉईन जी प्रियंका किंवा दीपिका यांच्या जवळ जाते. व्हीलनचे काम केलेला प्रकाश राज नेहमीसारखच वाटतो. काही ठिकाणी हास्यास्पदही होतो. त्याला हळव्या पित्याचा रोल सफाईने जमत नाही. साजिद-वाजिदची गाणी चांगली आहेत पण स्वप्नदृश्य म्हणून घुसडलेलीच वाटतात. सध्याच्या सुट्ट्यांच्या दिवसात कोणत्याही फार मोठ्या चित्रपटाची स्पर्धा या चित्रपटाला नसल्याने हिरोपंती चालून जाईल. टाईमपास म्हणून चित्रपट बरा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi