Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'डी-डे' घटनांची उत्तम बांधणी

चित्रपट परीक्षण

'डी-डे' घटनांची उत्तम बांधणी

वेबदुनिया

WD
आऊट ऑफ द बॉक्स जाण्याचा प्रयत्न सगळेच करतात असं नाही. प्रेमकहाण्या दाखवणं हा कोणाचा बाज असतो तर रहस्यकथा दाखवण्यात कोणाचा हातखंडा. काहींचं क्राइम , थ्रिलरवर प्रभुत्व, तर काही कॉमेडीच्या चौकटीत रमतात. पण नेहमीपेक्षा वेगळा प्रकार हाताळण्याचा अनेक दिग्दर्शक प्रयत्न करतात. काही यशस्वी झाले तर काही फेल. निखिल अडवाणी हा त्यातल्या यशस्वी वर्गात मोडतो असं म्हणायला हरकत नाही.

कारण नुकताच आलेला निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘डी- डे’ मध्ये मात्र घटनांची साखळी उत्तम बांधल्याने सिनेमा करमणूक करतो. याचं श्रेय दिग्दर्शकाला. भारतात स्फोट घडवणारी व्यक्ती पाकिस्तानात बसली आहे. तिला पकडण्यासाठी चार भारतीय एजंट पाकिस्तानात जातात. झोया (हुमा कुरेशी), रुद्र (अजरुन रामपाल), वाली खान (इरफान खान) आणि अस्लम (आकाश दाहिया) या चारही एजंटची प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. वेगवेगळ्या कारणांनी त्यांचं ध्येय एकच असतं की, भारतात स्फोट घडवून आणलेला आणि पाकिस्तानात लपलेला इक्बाल सेठ (ऋषी कपूर) याला पकडून भारतात आणणं.

ठरल्याप्रमाणे ‘मिशन गोल्डमॅन’ सुरू होतं. इक्बालच्या मुलाच्या लग्नाच्या दिवशीच त्याला पकडायचा प्लॅन असतो. पण, सगळं काही नियोजित असताना चित्र फिस्कटतं. इक्बाल या चौघांच्या हातून निसटतो. मग या चौघांच्या मागे तिथले पोलीस व इक्बालची माणसं लागतात. पण, हे चौघं पुन्हा इक्बालला पकडण्याचे प्लॅन्स आखतात. यावेळी तरी तो पकडला जातो का? हे जाणून घेण्यासाठी पहा डी-डे.

Share this Story:

Follow Webdunia marathi