Article Film Review Marathi 13 %e0%a4%ac%e0%a5%80 %e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%87 %e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87 109030700016_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'13 बी' घाबरणे जरूरी आहे

13 बी घाबरणे जरूरी आहे
बॅनर - बिग पिक्चर्स
दिग्दर्शक - विक्रम के. कुमार
संगीत - शंकर-अहसान-लॉय
कलाकार - आर माधवन, नीतू चंद्रा, सचिन खेड़ेकर, मुरली शर्मा, पूनम ढिल्लो, दीपक डोब्रियाल, धृतमान चटर्जी

माणसाला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टींपासून तो दूर पळत असतो. पण, घाबरण्यासाठी माणूस पैसे देऊन हॉरर चित्रपट पाहण्यासाठी जातो. भीतीने गाळण उडली पाहिजे, असे चित्रपट पाहण्याची अशा प्रेक्षकांची इच्छा असते. '13 बी' ने या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. हा चित्रपट थरकाप उडविणारा आहे.

IFM
हॉरर चित्रपट म्हटले की भुताचे चेहरे, भूतबंगला, पांढ-या साडीमध्ये वावरणारे भूत, अमावस्याची रात्र दाखविली गेलीच पाहिजे असा अलिखित नियम आहे पण, '13 बी' हा हॉरर चित्रपट असूनही याला अपवाद आहे. या चित्रपटात टीव्ही, बल्ब, लिफ्ट, मोबाईल सारख्या वस्तूंचीही भीती वाटते.

मनोहर (आर. माधवन) आपल्या कुटुंबासमवेत फ्लॅट 13-बी मध्ये राहायला जातो. त्याच्या घरातही चोवीस तास टीव्ही मालिका सुरू असतात. एक दिवस 'सब खैरियत है' ही नवीन मालिका सुरू होते. त्या मालिकेमध्ये ज्या घटना दाखविण्यात येतात त्या मनोहरच्या कुटुंबामध्येही घडू लागतात.

सुरुवातीला चांगल्या घटना घडतात पण, मालिकेमध्ये दाखविण्यात आल्यानुसार वाईट घटना घडू लागतात. आपल्या आयुष्यात घडणा-या आणि मालिकेतील घटनांमध्ये सामर्म्य आहे, हे मनोहरच्या लक्षात आल्यानंतर तो यामागील गूढ उकलण्याचा प्रयत्न करू लागतो.

webdunia
IFM
विक्रम के. कुमार यांनी दिग्दर्शकाबरोबरच कथाही लिहिली आहे. चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत त्यांनी गूढ कायम राखले आहे. मनोहर लिफ्टमध्ये बसल्यानंतरही लिफ्ट सुरू होत नाही. शेजारचे कुत्रे त्याच्या घरात येण्यास घाबरते, मोबाईलमध्ये काढण्याच येणारे फोटोही भीतिदायकच असतात. ही दृश्ये पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहतो. चित्रपटाच्या दूस-या भागात हळूहळू गूढ उकलण्यात येते. चित्रपटाच्या कथानकात जबरदस्त चढ-उतार, तणाव आणि भीती आहे.

माधवन, नीतू चंद्रा, सचिन खेडेकर, धृतमान चटर्जी, मुरली शर्मा, दीपक डोब्रियाल आणि पूनम ढिल्लो यांनी आपापली भूमिका सुंदर वठवली आहे. पी. सी. श्रीराम यांनी आपल्या कॅम-यातून कमालीचे चित्रण केले आहे. आपण भीती अनुभवायची असल्यास '13 बी' नक्की पाहा.

Share this Story:

Follow Webdunia marathi