Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Filfm Review : नीरजा

Filfm Review : नीरजा
, शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2016 (15:53 IST)
क्रिटिक रेटिंग 3.5 
स्टार कास्ट सोनम कपूर, शबाना आझमी, शेखर रावजिया, हरीश टीकू
दिग्दर्शिक राम माधवानी
निर्माता अतुल कस्बेकर
संगीत दिग्दर्शक विशाल खुराणा
जॉनर क्राईम थ्रिलर
अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर चित्रपट 'नीरजा' सोनमचे सर्वात उत्कृष्ट चित्रपट आहे. चित्रपटाची कथा फारच दमदार आहे. नीरजाचे पास्ट चित्रपटाला आधार देतो. कथेत प्लेन हायजॅकचे संपूर्ण घटनाक्रम चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहे. दिल्लीहून फ्रेकफर्टला जणार्‍या   फ्लाईटला कसे कराचीत हायजॅक केले जाते.  
 
एक सत्य हायजॅक घटनेवर आधारित या चित्रपटात बरेच अशे प्रसंग येतात जे तुम्हाला अचंभित करून देतील. खास करून हायजॅकर्स द्वारे पॅसेंजर्सवर केलेले अत्याचार. या चित्रपटाचे निर्देशनाची खास बाब अशी आहे की याला पूर्णपणे रियलिस्टिक अंदाजात पेश करण्यात आले आहे. 
 
चित्रपटात अॅक्टिंगची गोष्ट केली तर सोनमने फार प्रभावित केले आहे. सोनमची भूमिका फारच उत्तम आहे. सोनम शिवाय शबाना आजमीची भूमिका देखील फार दमदार आहे.     
 
राम माधवानीचे निर्देशन देखील कमालीचे आहे जे प्रेक्षकांना बांधून ठेवत. या चित्रपटाच्या मेकिंगची तुलना कुठल्याही इंटरनॅशनल हायजॅकिंग चित्रपटाशी करू शकता.  
 
एयरलिफ्ट नंतर नीरजा तुमच्यात माणुसकी आणि देशभक्तीची जाणीव करून देते. याची पूर्तता फक्त चित्रपट बघूनच अनुभव करू शकतो. हे चित्रपट फक्त हायजॅकिंगच नाही तर मानवीय घटकांना उत्तमरीत्या दर्शवत.  
 
सत्य घटनेवर आधारित आहे चित्रपट    
राम माधवानीच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेले हे चित्रपट एअर होस्टेस नीरजा भनोतच्या जीवनावर आधारित आहे. 1986मध्ये काही दहशतवाद्यांनी पैन-एम 73 प्रवासी विमान हायजॅक केले होते. या दरम्यान फ्लाईट अटेंडेंट नीरजा भनोतने आपले प्राण गमावून फ्लाईटमध्ये उपस्थित 360 लोकांचा जीवन वाचवला होता. नीरजाचे वय त्या वेळेस फक्त 23 वर्ष होते. तिच्या या बहादुरीसाठी तिला मरणोपरांत अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले, हे चक्र मिळवणारी ती सर्वात कमी वयाची महिला होती.  
 
नीरजाच्या भूमिकेत सोनम कपूर
फॉक्स स्टार स्टुडियोज आणि ब्लिंग अनप्लग्ड द्वारे निर्मित या चित्रपटात सोनम कपूरने नीरजा भनोतची भूमिका साकारली आहे. चित्रपटात  शबाना आजमी नीरजाच्या आईच्या भूमिकेत आहे. त्याशिवाय म्युझिक डायरेक्टर शेखर राविजियानी या चित्रपटापासून ऍक्टींग करियरची   सुरुवात करत आहे. 

 

Share this Story:

Follow Webdunia marathi