Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Movie Review: पूर्ण कुटुंबियांसाठी आहे 'दंगल'

Movie Review: पूर्ण कुटुंबियांसाठी आहे 'दंगल'
, गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (11:45 IST)
Genre: स्पोर्ट्स ड्रामा
Director: नितेश तिवारी
Plot: ही कथा एक वडील आणि त्याच्या स्वप्नाची आहे, ज्याला मुलांच्या जागेवर मुली पूर्ण करतात.  
स्टार कास्ट आमिर खान, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, साक्षी तंवर, जायरा वसीम, सुहानी भटनागर
डायरेक्टर नितेश तिवारी
प्रोड्यूसर आमिर खान, यूटीवी, किरण राव
संगीत प्रीतम
 
आमिर खान फिल्म 'पीके'च्या दोन वर्षांनंतर आता स्पोर्ट्स ड्रामा बेस्ड बायोपिक घेऊन आला आहे, ज्याला 'भूतनाथ रिटर्न्स' आणि 'चिल्लर पार्टी' सारख्या चित्रपटांचे डायरेक्टर नितेश तिवारी यांनी डायरेक्ट केले आहे. चित्रपटाबद्दल जाणून घेऊ.   
 
कथा ...
ही कथा रेसलर (कुस्तीपटू) महावीर फोगाट (आमिर खान)ची आहे, ज्याचे स्वप्न आहे की त्याने आपल्या देशासाठी रेसलिंगमध्ये गोल्ड जिंकायला पाहिजे. पण त्याचे हे स्वप्न काही पूर्ण होऊ शकत नाही. आता महावीराची एकच इच्छा आहे की त्याचे हे स्वप्न त्याच्या मुलाने पूर्ण केला पाहिजे. महावीर आणि त्याची बायको शोभा कौर (साक्षी तंवर)ला मुलगा नसून 4 मुली असतात. पण काही वर्षानंतर त्याला कळते की त्याच्या मुली गीता [जायरा(लहानपणाची), फातिमा सना शेख(मोठी झाल्यावर)] आणि बबिता [सुहानी (लहानपणी), सान्या मल्होत्रा (मोठी झाल्यावर) ] 2 मुलांची पिटाई करून आल्या आहेत तर त्याला विश्वास होऊन जातो की देशासाठी गोल्ड मेडल त्याच्या मुली जिंकू शकतात. महावीर दोन्ही मुलींना रेसलिंगची ट्रेनिंग देतो आणि शेवटी ह्या मुली आई वडिलांसोबत आपल्या देशाचे नाव वर्ल्ड लेवलवर घेऊन येतात.  
 
डायरेक्शन...
चित्रपटाचे डायरेक्शन फारच उत्तम आहे. रियल लोकेशंसची शूटिंग बघायला मिळते. डायरेक्टरच्या रूपात नितेश तिवारी यांचे हे फार मोठे चित्रपट आहे, ज्यात त्यांनी गजबचे डायरेक्शन केले आहे. सीन शूट करणे भले सोपे असेल, पण त्याचे इमोशन्सला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे नितेशने 100 % काम केले आहे. डायरेक्शनसोबत चित्रपटाची कास्टिंग देखील योग्य आहे, ज्याची परफ़ॉर्मेंसपण कमालीची आहे. चित्रपट तुम्हाला इमोशनलपण करतो आणि प्रेरित देखील.  
 
webdunia
स्टारकास्टची परफॉर्मेंस...
आमिर खानचा हा परफ़ॉर्मेंस त्याच्या मागच्या चित्रपटांपासून फारच वेगळा आहे आणि तो मनापर्यंत पोहोचतो. चित्रपटाच्या प्रत्येक कलाकाराने जोरदार प्रदर्शन केला आहे. आईच्या रूपात साक्षी तंवरने छोटी गीता बबिताच्या रूपात जायरा आणि सुहानीने, तसेच मोठी  गीता आणि बबिताच्या भूमिकेत फातिमा आणि सान्या मल्होत्राने फारच उत्तम एक्टिंग केली आहे. आमिरच्या भाच्याची भूमिका अपारशक्ति खुरानाने देखील चांगले काम केले आहे.  
चित्रपटाचे म्युझिक...
चित्रपटाचे प्रत्येेक गीत या प्रकारे चि‍त्रवण्यात आले आहे की तुम्ही कथेसोबत चालत राहता आणि गाणं केव्हा संपत हे कळतच नाही. प्रत्येक गाणं कथेप्रमाणे असून फारच सटीक आहे.  
 
बघावे की नाही ...
आमिर खान आणि प्रत्येक कलाकाराच्या उत्कृष्ट परफ़ॉर्मेंससाठी हे चित्रपट संपूर्ण परिवारासोबत बघू शकता.  
 
क्रिटिक रेटिंग 4 /5

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मार्चमध्ये सुरू करेल अजय देवगन आपल्या नवीन चित्रपटाची शूटिंग