Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

MOVIE REVIEW: डार्क शेड चित्रपट बघणार्‍यांना पसंत पडेल 'उडता पंजाब'

MOVIE REVIEW: डार्क शेड चित्रपट बघणार्‍यांना पसंत पडेल 'उडता पंजाब'
, शुक्रवार, 17 जून 2016 (14:05 IST)
बरेच कॉन्ट्रोवर्सी नंतर 'उडता पंजाब' आज रिलीज झाले आहे. कधी प्रोड्यूसर-डायरेक्टर विशाल भारद्वाज यांना असिस्ट करून चुकले अभिषेक चौबेने 2010मध्ये 'इश्कियां' आणि नंतर 'डेढ़ इश्कियां' डायरेक्ट केले होते. त्यानंतर 'उडता पंजाब'ला अभिषेकने डायेक्ट केले आहे. 
  
क्रिटिक रेटिंग 3.5/5
स्टार कास्ट शाहिद कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर खान, दिलजीत दोसांझ
डायरेक्टर अभिषेक चौबे
प्रोड्यूसर बालाजी मोशन पिक्चर्स , फँटम फिल्म्स
म्युझिक   डायरेक्टर अमित त्रिवेदी
जॉनर क्राईम थ्रिलर
 
मोठ्या स्टार्सला घेऊन अभिषेकने यंदा पंजाबच्या बँक ड्रॉपवर चित्रपट तयार केले आहे.  
 
कथा ...
चित्रपटाची कथा पंजाबमध्ये चार वेग वेगळ्या लोकांची आहे. एकीकडे रॉक स्टार टॉमी सिंह (शाहिद कपूर) आहे ज्याला ड्रग्सची वाईट सवय आहे. तसेच बिहारहून पंजाब आलेली मुलगी (आलिया भट्ट) आहे, जिचे स्वप्न वेगळेच होते पण परिस्थितीने तिला दुसर्‍याच मार्गावर पोहोचवले. चित्रपटाचा तिसरा महत्त्वाचा किरदार डॉक्टर प्रीत साहनी (करीना कपूर खान) आहे. जेव्हाकी चवथी कथा पोलिस अफसर सरताज सिंह (दिलजीत दोसांझ)ची आहे. वेग वेगळ्या प्रकारे या लोकांच्या जीवनाला ड्रग्सने कसे प्रभावित केले? चित्रपटात हेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  
 
डायरेक्शन...
चित्रपटाचे डायरेक्शन तुम्हाला डार्क शेडमध्ये मिळेल, जेथे प्रत्येक किरदार एक महत्त्वाच्या भूमिकते आपले डायलॉग म्हणताना दिसतो.   चित्रपटात प्रत्येक चारित्र्याचा लुक फारच अद्भुत आहे, याला प्रत्येकाने चित्रपटाचे ट्रेलर बघून अनुभवालाच असेल. पंजाबच्या रियल लोकेशंस बघायला चांगल्या वाटतात. पण हे चित्रपट एक खास प्रकारच्या ऑडियंसलाच आवडेल. काही शॉट्स अभिषेक चौबेने फारच उत्तम घेतले आहे, खास करून तो सीन जेव्हा पहिल्यांदा आलिया भट्ट आणि शाहिद कपूर एक मेकनं भेटतात.  
webdunia
स्टारकास्टची परफॉर्मेंस...
आलिया भट्टचे ट्रांसफॉर्मेशन कमालीचे आहे, जेव्हा की शाहिद कपूरने देखील आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. शाहिद आणि   आलिया; एक ड्रग्स एडिक्ट पॉप सिंगर आणि बिहारहून आलेली माइग्रेंट मुलगीला ऍक्ट दाखवण्यात यशस्वी झाले आहे. काही दृश्यांमध्ये करीना कूपरदेखील प्रभावित करते जेव्हा की पंजाब पोलिस ऑफिसरचा रोल करणार्‍या दिलजीतने फारच सहज ऍक्टींग केली आहे. चित्रपटातील बाकी कलाकारांची अॅक्टिंग देखील प्रशंसनीय आहे.  
 
चित्रपटाचे म्युझिक ...
चित्रपटाचा एक खास म्युझिक स्ट्रक्चर आहे ज्याला अमित त्रिवेदीने फारच उत्तमरीत्या साकारले आहे. चित्रपटाचे म्युझिक कथेत जीव आणतो. चित्रपटाच्या सुरुवातीत 'चिट्टा वे' गीत येताच तुम्हाला चित्रपट कसे आहे हे कळून येईल आणि 'इक कुड़ी' वाला गीत देखील विचार करण्यास भाग पाडतो. 
 
बघावे की नाही ...
जर डार्क शेड आणि महत्त्वाच्या इश्यूजवर आधारित चित्रपट पसंत असेल आणि वर लिहिलेले स्टार्स तुम्हाला पसंत असतील तर हे चित्रपट नक्की बघा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उडता पंजाब’च्या लीक कॉपीत व्हायरस?