Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Movie Review : अॅक्शन आणि इमोशनने भरपूर आहे अजय देवगनची 'शिवाय'

Movie Review :  अॅक्शन आणि इमोशनने भरपूर आहे अजय देवगनची 'शिवाय'
, शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016 (11:57 IST)
बर्‍याच दिवसांपासून या दिवाळीच्या मोक्यावर रिलीज होणार्‍या चित्रपटांची चर्चा होत होती. शेवटी 'शिवाय' ऑडियंसपर्यंत पोहोचली. तर जाणून घेऊ अजय देवगनच्या   डायरेक्शनमध्ये बनलेला हा चित्रपट कसा असेल.   
कथा ...

क्रिटिक रेटिंग 3 /5
स्टार कास्ट अजय देवगन, सायेशा सहगल, एरिका कार, अबिगेल यम्स, वीर दास, गिरीश कर्नाड, सौरभ शुक्ला
डायरेक्टर अजय देवगन
प्रोड्यूसर अजय देवगन, पेन इंडिया मूवीज
म्युझिक मिथुन
जॉनर ऍक्शन थ्रिलर
 
ही कथा शिवाय (अजय देवगण)ची आहे, जो गिर्यारोहकांचा चा प्रशिक्षक आहे. जेव्हा  बुल्गारियाची राहणारी मुलगी ओल्गा (एरिका कार) गिर्यारोहणासाठी शिवायजवळ येते तेव्हा शिवाय ओल्गाच्या प्रेमात पडतो. नंतर तिची मुलगी गौरा (अबिगेल) येते आणि कथेत ट्विस्ट आणि टर्न्स समोर येतात. शिवायला हिमालयातून बुल्गारिया जावे लागते. शेवटी कथेला अंजाम मिळतो.    
 
डायरेक्शन...
चित्रपटाचे डायरेक्शन उत्तम आहे. विजुअलप्रमाणे चित्रपट फारच रीच आहे. माउंटेन्स, चेस सीक्वेंस, रोमँटिक सीन्स, अॅक्शन सिक्वेंसला कॅमेर्‍यात उतरवण्यासाठी पडद्या मागती मेहनत स्पष्ट दिसून येते. सिनेमॅटोग्राफीसाठी असीम बजाज यांची प्रशंसा करावी लागेल. चित्रपटात फारच उत्तम कॅमेरा वर्क आहे. चित्रपटाच्या कथेत स्क्रिप्टला संदीप श्रीवास्तवने फारच उत्तमप्रकारे साकारले आहे. डायलॉग्सचे आदान-प्रदान तसेच   फिल्मांकनाचे कमाल आहे. फक्त कथा थोडी लांबवण्यात आली आहे. इंटरव्हलनंतरच्या भागाला जर जास्त एडिट केले असते तर चित्रपट जास्त मनोरंजक बनले असते.  
 
स्टारकास्टची परफॉर्मेंस...
चित्रपटात अजय देवगनने एकदा परत उत्कृष्ट परफॉर्मेंस दिले आहे. तसेच एक्ट्रेस सायेशा सहगल आणि एरिका कारचे ट्रॅक देखील चांगले आहे. लहान मुलीच्या भूमिकेत  अबिगेलने फारच छान अॅक्टिंग केली आहे. गिरीश कर्नाड, वीर दास आणि सौरभ शुक्लासोबत बाकी कलाकारांचे काम देखील उत्तम आहे.  
 
webdunia
फिल्म म्युझिक ...
चित्रपटाचे म्युझिकचे कमाल आहे. खास करून याचा बॅकग्राऊंड स्कोर उत्तम आहे. अजय देवगनच्या एंट्री वाला सिक्वेंस, तसेच काही क्षण असे ही येतात जेथे प्रेक्षकांच्या शिट्या ऐकायला मिळतात.  
 
webdunia
बघावे की नाही ...
हॉलिवूडच्या चित्रपटांचे चित्रीकरण जर तुम्हाला पसंत पडत असेल आणि त्यात तुम्हाला देशी फ्लेवरला एन्जॉय करायचा असेल तर या दिवाळीत पूर्ण परिवारासोबत हे चित्रपट बघू शकता. ही इंटरनॅशनल चित्रपटांची आठवण करून देईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिन दिन दिवाळी भावाला ओवाळी.....