Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक फसलेला 'जॅकपॉट'

जॅकपॉट
'जॅकपॉट' एक फुल्ल थ्रिलर मूव्ही आहे. म्हणून यात सगळे क्रेजी कलाकार भरले आहेत. सिनेमाचे शीर्षक हे गोव्‍यातील एका कॅसिनोचे नाव आहे. गोव्यात 'जॅकपॉट' नामक बोट कॅसीनो असून त्याभोवती या सिनेमाचे कथानक फिरले आहे.

गोवाची शान असलेला हा 'जॅकपॉट' 24 तास खुला असतो. काही यंगस्टर्स नियोजनबद्ध कॅसिनोत जुगार खेळण्यासाठी येतात. माया म्हणजे सनी लियोनी अन् फ्रान्सिस म्हणजे सचिन जोशी हे चोर आहेत. आतापर्यंत भुरट्या चोर्‍या करून पोट भरणारी ही मंडळी मोठा आता हात मारण्याच्या विचारात आहे. काहीतरी मोठा जुगाड करण्‍यासाठी दोघेही कॅसिनोत आले आहेत. दोघांचा येथील 'जॅकपॉट'वर डोळा असून मोठी रक्कम लंपास करून 'छू मंतर' व्हायचा प्लॅन आहे. कॅसीनोचा व्यवस्थापक (नसीरुद्दीन शाह) सगळं पाहात असूनही मायाच्या बोल्ड अदांनी घायाळ झाला आहे. या दरम्यान, एक हलकासा रोमान्सही दाखवण्यात आला आहे.त्यामुळे कथानकाला एक वेगळा शेड आला आहे. हे या सिनेमाचं वेगळंपण म्हणता येईल.

'जॅकपॉट'मध्ये नवीन असे काहीच नाही. कैजाद यांचे डिरेक्शनही वाखाणण्याजोगे आहे, असे मुळीच म्हणता येणार नाही. सनीचा बोल्डनेसही जुनाच आहे. नसीरुद्दीन शाहचा वेगळा लूक तेवढा वेगळा म्हणता येईल. अर्थात नव्या बाटलीत जुनीच दारु असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.

शारिब आणि तोशी यांनी म्युझिक देऊन 'जॅकपॉट'ला सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. प्रेक्षक जर सनीचा चाहता असेल तरच तो सिनेमा संपेपर्यंत थिअटरमध्ये थांबले अन्यथा पहिल्या अर्ध्यातासात खूर्ची सोडेल. एकूणात सांगायचे तर 'जॅकपॉट' हा ढिसाळ कारभाराचे उत्तम उदाहरण आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi