Article Film Review Marathi %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c %e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0 %e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be 108101800004_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'कर्ज' - भरपूर मसाला

कर्ज भरपूर मसाला
IFMIFM
निर्माता - भूषण कुमार, किशन कुमार
दिग्दर्शक - सतीश कौशिक
संगीत - हिमेश रेशमिया
कलाकार - हिमेश रेशमिया, श्वेता कुमार, उर्मिला मातोंडकर, डैनी, डीनो मोरिया, गुलशन ग्रोवर, रोहिणी हट्टंगडी,
बख्तियार इराणी, राज बब्बर, असरान

चित्रपटाचा रीमेक बनविण्यात सतीश कौशिक यांचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यांनी दक्षिण भारतातील भाषांतील चित्रपट हिंदीत रीमेक केले. यावेळी त्यांनी सुभाष घई यांचा 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कर्ज' च्या धर्तीवर हिमेश रेशमियाला घेऊन ‘कर्ज’ची निर्मिती केली आहे.

webdunia
IFMIFM
मॉटी (हिमेश रेशमिया) हा दक्षिण आफ्रिकेतील एक यशस्वी आणि प्रसिद्ध रॉकस्टार आहे. एका पार्टीमध्ये त्याची भेट टिना (श्वेता कुमार) शी होते. टिनाला पाहतातच मॉटी तिच्या प्रेमात पडतो. एक दिवस तालीम सुरू असताना मॉटी एक धून वाजवू लागतो. त्याच्या डोळ्यासमोर एक बंगला, मंदिर आणि सुंदर मुलगी दिसू लागते. तो बेशुद्ध होऊन कोसळतो.

सुट्टीच्या ‍दिवसात तो केरळला जातो. तेथे त्याला स्वप्नात दिसणारा बंगला दिसतो. त्या बंगल्याबद्दल तो माहिती घेतो. तो बंगला रवी वर्मा (डीनो मोरिया) चा असतो. रवीचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर आई व बहीण कोठे गेल्या याची कोणालाच माहिती नसते. आता मॉटीच्या डोळ्यासमोर साफ चित्र उभे राहते आणि त्याला सर्व काही लक्षात येते.

रवी वर्मा दुसरा कोणी नाही तर तो स्वतः असतो. त्याने कामिनी (उर्मिला मातोंडकर) नामक युवतीशी प्रेमविवाह केला होता, हे देखील त्याच्या लक्षात येते. कामिनी जिवंत असल्याने तिचा शोध घेण्याचे तो ठरवतो. ती टिनाचे पालन-पोषण कामिनी करत असते.

webdunia
IFMIFM
चित्रपटाची कथा ताकदीची आहे. पुनर्जन्म, प्रेम, प्रतिकार, भाऊ-बहिणीचे प्रेम सारखे मसाला चित्रपटांतील सगळे गुण दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी यामध्ये वापरले आहेत. चित्रपटाचा वेग कायम राखताना त्यांनी अनेक नाटकीय घटना यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. पण, चित्रपटाचे सादरीकरण आजच्या जमान्यातील वाटत नाही. कौशिक यांनी 70, 80 दशकातील टच दिला आहे. सामान्य प्रेक्षकांसाठी आपण चित्रपट बनवत आहे, हे त्यांच्या लक्षात असल्याने त्यांचा उद्देश सफल झाला आहे.

webdunia
IFMIFM
चित्रपटात काही कमतरताही आहेत. उर्मिलाच्या वयात 25 वर्षानंतर काहीच फरक दिसून येत नाही. उर्मिलाने रवी वर्माच्या आई व बहिणीला का सोडून दिले? याचा खुलासा होत नाही. मध्यांतरानंतर चित्रपटाची गती एकदम कमी होते आणि क्लायमेक्सच्यावेळी चित्रपट पुन्हा गती पकडतो. पटकथा लेखक शिराज अहमद यांनी घई यांच्या 'कर्ज' मध्ये थोडा बदल केला आहे. पण, त्यामुळे कथेत काहीच फरक पडत नाही.

या चित्रपटाची मोठी कमजोरी म्हणजे अभिनेता हिमेश रेशमिया हा आहे. त्याला अभिनयाचा गंधही नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सतीश कौशिक यांनी चतुराईने त्याच्यातील कमीपणा लपविण्याचा प्रयत्न केला आहे.

श्वेता कुमार या नव्या नायिकेचाही चित्रपटात काहीच प्रभाव पडत नाही. उर्मिला मातोंडकरने खलनायिकेच्या भूमिकेत ख-या अर्थाने चित्रपट 'खाल्ला' आहे. गुलशन ग्रोवर आणि राज बब्बरची भूमिका महत्त्वाची आहे. डॅनी आणि असरानीने प्रेक्षकांना हसविण्याचा प्रयत्न केला आहे. डीनो मोरिया आणि रोहिणी हट्टंगडी यांना कमीच संधी मिळाली.

webdunia
IFMIFM
संगीतकार म्हणून हिमेश रेशमियाला क्रेडिट द्यावेच लागेल. ‘तंदुरी नाइट्स’, ‘तेरे बीन चैन न आए’, ‘माशा अल्लाह’, ‘धूम तेरे प्यार की’ आणि ‘एक हसीना थी’ यांसारखी गाणी यापूर्वीच हिट झाली आहेत. गाण्यांचे फिल्मांकन भव्य आहे. काहीतरी वेगळे देण्याचा दावा या चित्रपटाने केलेले नाही. त्यामुळे जुना आणि नव्या कर्जची तुलना होऊ शकत नाही पण, मसालेदार चित्रपट पसंत करणा-या प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.
.

Share this Story:

Follow Webdunia marathi