प्रशिक्षण काळातील गमती जमती, गंभीर प्रसंग, सामन्यांमधील उत्कंठता दिग्दर्शकाने चांगलीच रेखाटली आहे. क्रिकेट सोडूनही इतर खेळांमध्येसुद्धा तितकीच उत्कंठता असते हे या चित्रपटात दिग्दर्शक अमिन यांनी दाखवून दिले आहे.मध्यंतरानंतर ऑस्ट्रेलियातील भारताचे सामने फार छान चित्रित केले आहेत. निवेदनाच्या रूपात चित्रपट पुढे सरकत राहतो. अंतिम सामन्यातही शेवटापर्यंत प्रेक्षक श्वास रोखून पाहत राहतो. दिग्दर्शकाने चित्रपटाला सुरुवातीपासून जी गती दिली आहे ती शेवटापर्यंत टिकवली आहे, त्यामुळे कुठेही कंटाळा येत नाही. या चित्रपटामुळे हॉकीकडे मुलींचा कल वाढला तर आश्चर्य वाटायला नको.शाहरुखनेही कबीरच्या भूमिकेत प्राण ओतला आहे. इतरही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. चित्रपटातील चक दे इंडिया हे गाणे आकर्षक आहे. सलिम-सुलेमानच्या जोडीने चांगले संगीत दिले आहे.
एकंदरीत यश चोप्रा यांनी एक चांगले कथानक घेऊन उत्कृष्ट चित्रपट काढला आहे. आतापर्यंतच्या हिंदी चित्रपटांमध्ये जे काही वेगळे किंवा हटके चित्रपट आहेत त्यात चक दे... चा समावेश करण्यास हरकत नाही.