Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपट परीक्षण : पीकू

Bollywood Gossip In Marathi
निर्देशक : सुजित सरकार
 
कलाकार : अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, इरफान खान, मौसमी चटर्जी, जिशु सेनगुप्ता, रघुवीर यादव      
 
शूजित सरकारचे ‘पीकू’ या वर्षाचे सर्वात सुंदर हिंदी चित्रपट आहे. हे तर स्क्रिप्ट रायटर जूही चतुर्वेदी आणि दिग्दर्शक शूजित सरकारची हिंमतच म्हणावी लागेल की कुठल्याही हिंदी चित्रपटात प्रथमच कथेत ‘बद्धकोष्ठता’ आणि ‘मोशन’ सारख्या बाबींना प्रेक्षकांसमोर आणले आहे. पण तरीही याचे कलाकार, त्यांची भावना, आपसातील संबंध आणि मानवी नातेसंबंधातील कळकळ मनाला अंत: स्पर्श करून जाते. 
 
ही कथा आहे पीकू (दीपिका पदुकोण)ची जी आपले पिता भासकौर बनर्जी (ते स्वत:ला भास्कर नसून भास्कौर म्हणणे पसंत करतात)सोबत दिल्लीच्या चित्तरंजन पार्कमध्ये राहते. पीकू एका कंपनीत नोकरी करते. पण तिचे संपूर्ण जग आपल्या पित्याच्या आजू बाजू फिरत असत कारण वडिलांना फक्त बद्धकोष्ठतेचा त्रास नसतो बलकी ते चोवीस तास फक्त याबद्दलच बोलत राहतात.   
 
सकाळचा नाश्ता असो की डिनर टेबलवरच्या गप्पा, विषय फक्त पोट, बद्धकोष्ठता आणि मोशनच असतो. एक वेळा आजारपणातून उठल्यावर  भासकौर बनर्जीला आपले पैतृक शहर कोलकाताला जायचे असते, ते पण सडक मार्गाने. हिमाचल टॅक्सी सर्विसचा मालक राणा चौधरी (इरफ़ान) त्यांना घेऊन जातो. मग सुरू होतो या कलाकारांसोबत दिल्ली ते कोलकाताच प्रवास.
 
कलाकारांमध्ये हायपोकॉनड्रिऐक व्यक्तीच्या रूपात अमिताभ बच्चनने उत्तम काम केले आहे. हृषीकेश मुखर्जीच्या चित्रपटांमध्ये असल्या  प्रकाराच्या भूमिका उत्पल दत्त करत होते पण अमिताभ बच्चनने याला एक वेगळे आकार दिले आहे. एक असा पात्र जो जुन्या पीढीचा असला तरी महिलांच्या बाबतीत आपली एक वेगळी ओळख आणि त्यांच्याबद्दल उत्तम विचार ठेवतो आणि जो जुने टेलीग्राफ़ वृत्तपत्र वाचतो कारण त्यात त्याच्या शहराचे वृत्त असतात.   
 
webdunia
भले मोशन होत नसेल पण अस्वस्थतेचे दृश्य असो, इरफ़ानसोबत चर्चा असो किंवा सायकलवर कोलकाता फिरताना त्यांचा चेहरा,  अमिताभ प्रत्येक दृश्यात लाजवाब दिसले. टायटल रोलमध्ये जी परिपक्वता दीपिका पदुकोणने दाखवली आहे, त्यात नवीन उमेद दिसून येतो. दीपिकाला कदाचित म्हणूनच बॉलीवूडची नंबर वन अभिनेत्री म्हटले जाते.  
 
इरफ़ान इतक्या सरळतेने रोल स्वीकारतो की वाटतच नाही तो अभिनय करत आहे. लहान भूमिकेत मौसमी चटर्जीपण फार सुंदर दिसली आहे. पीकूमध्ये कुठलाही भारी भरकम ड्रामा नाही आहे. हाच सादेपणा या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत आहे. चित्रपटातील तिनी मुख्य  कलाकारांचे डायलॉग आणि अभिनय चित्रपटाचे जीवन आहे.   
 
शूजित सरकारने उत्तम चित्रपट तयार केले आहे. याला न पाहण्याचे एकही कारण नाही आहे. या विकेंडला सलमान खान आणि त्याच्या  केसची चर्चा विसरून पीकूसोबत दिल्ली-कोलकाताच्या प्रवासावर नक्की जा.

रेटिंग : 4 

Share this Story:

Follow Webdunia marathi