Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेल- पाहून या !

जेल नील नितिन मुकेश

वेबदुनिया

IFM
IFM
बॅनर : परसेप्ट पिक्चर कंपनी, भांडारकर एंटरटेनमेंट
दिग्दर्शक : मधुर भांडारक
संगीत : शरीब साबरी, तोशी साबरी, शमीर टंड
कलाकार : नील नितिन मुकेश, मुग्धा गोडसे, मनोज बाजपेयी, आर्य बब्बर, चेतन पंडित, राहुल सिं

मधुर भांडारकरच्या चित्रपटांची चौकट ठरलेली असते. एकेक क्षेत्र निवडून त्यातले 'डिटेल्स' मांडणे ही त्याची शैली आहे. चांदनी बार, पेज थ्री, ट्रॅफिक सिग्नल, कॉर्पोरेट, फॅशन आणि आता जेल. नावावरूनच जेल म्हणजे तुरूगांतले जग भांडारकरांनी दाखवले आहे. तुरूंगातलं उघडं वाघडं आणि 'नांगडं' सत्य भांडारकरांनी यात मांडले आहे. हे जग दाखविण्यासाठी भांडारकरांनी त्या भोवती त्याला साजेशी अशी कथा रचली आहे. ही कथा आजूबाजूच्या परिस्थितीत बर्‍यापैकी एकजीव झाल्याने एक चांगली कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळतो.

जेल ही कथा आहे, पराग दीक्षित (नील नितिन मुकेश) या तरूणाची. पराग महत्त्वाकांक्षी आहे. जग जिंकण्याची त्याची महत्त्वाकांक्षा आहे. लहान वयातच सारे काही त्याला मिळाले आहे. छानशी नोकरी आणि तितकीच छान छोकरी मानसीही (मुग्धा गोडसे) त्याच्याबरोबर आहे. सगळे काही छान चालले असतानाच कथेला वळण मिळते.

परागबरोबर रहाणार्‍या त्याच्या रूममेटचे खरे आयुष्य त्याला माहितीच नसते. त्याच्या खोलीत रहात असल्याने परागला ड्रग्जच्या जाळ्यात सहभाग असल्याच्या कारणावरून पोलिस अटक करतात. परागचा मित्रच त्याला यात अडकवतो. इथून परागच्या दुर्देवाचे दशावतार सुरू होतात.

webdunia
IFM
IFM
पोलिस कोठडीत पाठवलेल्या परागला पहिल्यांदा हे जग दिसते. तब्बल दोन वर्षे आपली केस सुनावणीला येईपर्यंत हे जग पहात असतो. केस सुनावणीला आली तरीही कायदेशीर कचाट्यात अडकली जाते. स्वतःचे निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी जंग जंग पछाडूनही त्याला काय चालले आहे ते कळत नाही आणि ८ वर्षांची शिक्षा झाल्याची बातमी तेवढी त्याला कळते. या सगळ्याचा शेवट अर्थातच गोड होतो.

पण तोपर्यंत पोहोचेपर्यंत भांडारकर प्रेक्षकांना अस्वस्थ करण्याची संधी पूर्णपणे साधून घेतात. कथानकाचे बोट धरून जेल दाखविण्याचा भांडारकरांचा प्रयत्न चांगला जमला आहे.

अभिनयाच्या बाबतीत नील नितिन मुकेशला शंभर टक्के मार्क्स द्यायला हवेत. पूर्ण फोकस त्याच्यावर आहे आणि त्याने त्याला न्याय दिला आहे. देहबोलीपासून संवादांपर्यंत त्याने छाप पाडली आहे. मुग्धा गोडसेला संधी कमी असली तरी तिनेही छान काम केले आहे. ती नक्कीच लक्षात रहाते. वेगळ्या विषयावरचा चित्रपट म्हणून जेल पहायला हरकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi