Article Film Review Marathi %e0%a4%a2%e0%a5%82%e0%a4%82%e0%a4%a2%e0%a4%a4%e0%a5%87 %e0%a4%b0%e0%a4%b9 %e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%93%e0%a4%97%e0%a5%87 109030900086_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ढूंढते रह जाओगे

ढूंढते रह जाओगे
IFM
निर्माता - रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक - उमेश शुक्ला
संगीत - साजिद-वाजिद
कलाकार - सोनू सूद, सोहा अली खान, कुणाल खेमू, परेश रावल, दीपल शॉ, जॉनी लीवर, असरानी

काहीही करून प्रेक्षकांना हसवायचे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी ‘ढूंढते रह जाओगे’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

प्रत्येक दृश्यात लॉजिक ठेवूनच त्याने विनोद देण्याचा प्रयत्न केला आहे पण, ज्यांना अशा प्रकारचे चित्रपट आवडतात त्यांनाच 'ढूंढते रह जाओगे' पाहताना मजा येईल पण, ज्यांना असे विनोद मूर्खपणाचे वाटतात त्यांना हा चित्रपट बोर करणारा आहे.

आनंद (कुणाल खेमू) आणि राज (परेश रावल)ची कथा आहे. पैसा कमाविण्यासाठी ते एक फ्लॉप चित्रपट करण्याची योजना आखतात. ते 21 जणांकडून पाच-पाच कोटी रुपये गोळा करतात पण, केवळ दहा कोटी खर्च करून चित्रपटाची निर्मिती करतात. हा चित्रपट फ्लॉप होईल आणि नुकसान झाल्याचे सांगून पैसे लाटण्याचा त्यांचा डाव असतो पण, हा चित्रपट हिट होतो.

चित्रपटाची सुरुवात कंटाळवाणी आहे. जॉनी लीवरचे आगमन झाल्यानंतर थोडी गती येते. जॉनीने चित्रपटात कथालेखकाची भूमिका केली आहे. शोले, दिलवाले दुल्हनिया ले जाऐगे, गदर आणि लगान सारख्या चित्रपटांच्या कथेची मोडतोड करून तो नवीन कथा तयार करतो, असे दाखविण्यात आले आहे.

दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी कलाकारांची निवड उत्तम केली आहे. सोहा अली खान, सोनू सूद, कुणाल खेमू, परेश रावल आणि जॉनी लीवर यांचा अभिनय उत्तम आहे. साजिद-वाजिद यांचे संगीतही सुरेख आहे.

एकूणच 'ढूंढते रह जाओगे' हा चित्रपट डोक्याला जास्त त्रास न घेता चित्रपटांची मजा लुटणा-या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट उत्तम आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi