Article Film Review Marathi %e0%a4%a7%e0%a5%82%e0%a4%ae 3 %e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b0 %e0%a4%8f%e0%a4%95%e0%a5%87 %e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b0 113122100006_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धूम-3: आमिर एके आमिर

धूम3 आमिर एके आमिर
WD
'धूम-3'चे कथानक जादूगार इक्बाल (जॅकी श्रॉफ) याच्या 'द ग्रेट इंडियन सर्कस' भोवती फिरते. मात्र, शिकागोमधील ही सर्कस फ्लॉप ठरते. सर्कशीचा तंबूत बॅंकेचे कर्ज फेडायची ताकद नसल्याने इक्बाल खचून जातो. सर्कस वाचविण्यासाठी त्याचे अतोनात प्रयत्न सुरु असतात. मात्र त्याला त्यात यश येत नाही. सर्कसचा शो पाहून बॅंक कर्ज देण्यास नकार देते. हा धक्का इक्बाल सहन करू शकत नाही. तो आत्महत्या करतो. इक्बालचा मुलगा साहिर (अमिर खान) बॅंकेचा सूड घेण्यासाठी पेटून उठतो. वडिलांचे सर्कस पुन्हा सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण करण्‍यासाठी वाटेल ते करण्याची साहिरची तयारी असते. त्यासाठी तो बॅंक लुटण्याचा पर्याय निवडतो.

साहिर हा बॅंकेच्या प्रत्येक शाखेत चोरी करण्यास सुरूवात करतो. मात्र, साहिर याला कोणीही पकडू शकत नाही. 'धूम मचाए धूम' म्हणत साहिर पोलिसांच्या हातावर तूरी ठेवत शिकागोत धुमाकूळ घालतो... यापुढे मोठी स्टोरी आहे. मात्र, बाईकस्वार आमिरला पडद्यावर पाहणे चांगले ठरेल....

'धूम' सीरीजमधील 'धूम-3' हा तिसरा सिनेमा शुक्रवारी रिलिज झाला आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी 'धूम-3'ची निर्मिती केली आहे. अमिर खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, उदय चोप्रा, जॉकी श्रॉफ यांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मात्र, यात आमिरने बाजी मारली आहे. सगळ्यात तोच उठून दिसला आहे. त्याचा अभिनय जबरदस्त आहे. आमिरचे स्टंट हे 'धूम-3'चे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. स्टंटमुळे हा सिनेमा एकदम मस्त वाटतो. संपूर्ण सिनेमाचा रिल आमिरभोवती फिरत असल्याचे अन्य स्टार्सचे महत्व मात्र कमी झाल्याचे जाणवते.

'धूम-3'ची गाणी आणि संगीत लाजवाब आहे. 'धूम मचाए धूम' हे गीत आधीच खूप हिट झाल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवते. धूम-3 च्या निर्मितीवर सव्वा कोटी रूपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे 'यशराज' बॅनरखाली हा सिनेमा रिलिज झाला आहे.

अभिनयाच्या बाबतीत आमिर खान हा सगळ्यांचा बाप ठरला आहे. अभिषेक बच्चनसह कतरिनाचा अभिनय सामान्य आहे. इक्बालच्या भूमिकेला जॅकी श्रॉफने न्याय दिला आहे. कतरिनाचा डान्स तेवढा पाहाण्यासारखा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi