Article Film Review Marathi %e0%a4%b0%e0%a4%ac %e0%a4%a8%e0%a5%87 %e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a4%be %e0%a4%a6%e0%a5%80 %e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9f 108121300001_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'रब ने...' बना दी हिट

रब ने बना दी हिट
IFM
निर्माता - यश चोप्रा, आदित्य चोप्रा
दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद - आदित्य चोप्रा
गीतकार - जयदीप साहनी
संगीतकार - सलीम - सुलेमान मर्चेन्ट
कलाकार - शाहरुख खान, अनुष्का शर्मा (नवा चेहरा), विनय पाठक, विशेष भूमिका - काजोल, राणी मुखर्जी, प्रीति झिंटा, लारा दत्ता आणि बिपाशा बसु


रोमॅटिंक चित्रपट बनविण्यात यशराज फिल्म्सचा हातखंडा आहे. यश चोप्रा यांनी ढीगभर रोमॅटिंक चित्रपट केले आता आपली नाव बुडत असल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा ते रोमॅटिंक चित्रपटाकडे वळले आहेत.

webdunia
IFM
असे म्हणतात की, आपल्या जोडीदाराची गाठ ब्रह्मदेव स्वर्गातच बांधतात. आपण मनापासून प्रेम म्हणतो हे प्रेम मोबदल्यात काहीच मागत नाही. हा जुन्या गोष्टींनाच नव्या अंदाजात मांडत आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

यशराज ‍बॅनरच्या जुन्या रोमॅटिंक चित्रपटांशी तुलना केल्यास या चित्रपटात नक्कीच काही वेगळे आहे. यावेळी स्विट्जरलॅड नाही तर भारतातील शहरे आहेत. चि‍त्रपटातील पात्रे साध्या वेशात आहेत आणि सामान्य जीवन जगत आहेत. त्यांचे सौदर्य चेहरा नसून मनात आहे.

webdunia
IFM
पंजाब पॉवरमध्ये काम करणा-या सुरिंदर साहनी (शाहरुख खान)ची कथा आहे. तो मनाने खुप चांगला आहे. पण, या जमान्याच्या भाषेती 'स्मार्ट' नाही. डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा लावणा-या सुरिंदरला स्टाइलबाबत काहीच माहित नाही. त्याच्या प्राध्यापकांची मुलगी तानी (अनुष्का शर्मा)च्या लग्नासाठी तो जातो पण, व-हाडाचा अपघात होतो आणि त्यामध्ये तिच्या नियोजीत पतीसह सर्वांचाच मृत्यू होतो.

आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून तानी, सुरिंदरशी लग्न करते. सुरिंदर जितका बोरिंग आहे त्याउलट तानी जिंदादिल आहे. ती सुरिंदरचा आदर करते पण, त्याच्याशी प्रेम करू शकत नाही. तानी डांन्स शिकण्यासाठी जाते आणि तिचे मन जिंकण्यासाठी सुरिंदरही आपला लुक बदलतो. 'राज' या नव्या नावाने तो तेथे पोहोचतो. तीनाला तो आपला पती आहे हे ओळखू येत नाही. दोघे डांन्स पार्टनर बनतात.

webdunia
IFM
राजच्या रूपात सुरिंदर अपले जीवनच बदलून टाकतो. तोही रोमॅटिंक होतो आणि हळूहळू तानीही त्याच्यावर प्रेम करू लागते. आणि ती त्याच्याबरोबर पळून जाण्यास तयार होते. आपल्या ख-या रूपातच तिने आपल्यावर प्रेम करावे असे सुरिंदरला वाटत असते. त्यानंतर घटनाक्रमच असे होतात की, तानी त्याच्या अपेक्षेप्रमाणे ख-या रूपात प्रेम करू लागते.

प्रेमकथेची सुरूवात प्रेमाने सुरू होऊन लग्नावर येऊन थांबते. पण, आदित्य यांनी लग्नानंतर सुरू होणारी कथा निवडली आहे. सुरिंदर हे या कथेचे मजबुत पात्र आहे. आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शक म्हणून आपला सगळा अनुभव पणाला लावला आहे. सादरीकणात त्यांनी सगळ्या शैलींचा वापर केला आहे. म्हणूनच हा चित्रपट जवळजवळ तीन तास चालतो. छोटी-छोटी दृश्ये त्यांनी खुबीने शुट केली आहेत.

शाहरुख, अनुष्का आणि विनय पाठक या तीन पात्रांभोवती कथानक फिरते तरीदेखील कोठेच बोअर होत नाही. रोमांस, हास्य, आनंद, दु:ख यांचा सुंदर मिलाप घालून निखळ मनोरंजन पहायला मिळते. स्टेजवर डान्स करताना राज हाच सुरिंदर असल्याचे तानीला कळते, हा क्लायमॅक्स उत्तम आहे.

शाहरुख खानने दोन्ही भूमिका तेवढ्याच ताकदीने केल्या आहेत. सुरिंदरचा साधेपणा आणि रोमॅटिंक राजची भूमिका जिवंत वाटते. अनुष्का शर्माने पदार्पणातच पुर्ण आत्मविश्वासाने अभिनय केला आहे. शाहरुखच्या समोर तेवढ्याच धाडसाने तिने अभिनय केला आहे. पंजाबी मुलींचे सारे हाव-भाव तिने आपल्या अभिनयातून तंतोतंत मांडले आहेत. शाहरुखच्या मित्राच्या भूमिकेत विनय पाठक यांचा अभिनयही सरस आहे.


सलीम-सुलेमान यांचे संगीत चित्रपट बघताना अधिक चांगले वाटते. 'हौले-हौले' हे गाणे आगोदरच लोकप्रिय झाले आहे. 'डांस पे चांस' हे गाणे जेवढ्या चांगल्या पध्दतीने लिहले गेले आहे तेवढ्या चांगल्या पध्दतीने चित्रीत केले गेले आहे. 'हम हैं राही प्यार के' या गाण्यात काजोल, बिपाशा, लारा, प्रिती आणि राणी मुखर्जी सारख्या नायिका आहेत.

एकूणच 'रब ने बना दी जोडी' मनोरंजनाचे उत्तम पॅकेज आहे. सगळ्याच वर्गातील प्रेक्षकांना हा चित्रपट निश्चितच भावेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi