Article Film Review Marathi %e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8 %e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4 108032700013_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'रेस'ची शानदार सुरुवात

'रेस'ची शानदार सुरुवात
IFMIFM
अब्बास-मस्तान दिग्दर्शित 'रेस' चित्रपटाने जबरदस्त सुरुवात केली आहे. अबालवृद्धांची गर्दी या सिनेमासाठी लोटली आहे. बर्‍याच दिवसांनी मोठा चित्रपट प्रद्रर्शित झाल्याचा फायदा रेसला मिळाला. शिवाय परीक्षाही संपल्या आहेत. 21, 22 आणि 23 मार्चला सुटी असल्याचा फायदाही 'रेस'ला मिळाला.

चित्रपटातील स्टार आणि प्रसिद्धी यामुळेही लोक त्याकडे वळले. निर्मात्याला चित्रपटाला चांगली सुरुवात होईल अशी खात्री होतीच. त्यामुळे त्यांनी बर्‍याच प्रिंट काढून चित्रपट प्रदर्शित केला.

मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला '26 जुलै एट बरिस्ता' सुपर फ्लॉप ठरला. मुंबईत झालेल्या पावसावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा नगण्य प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शो देखील रद्द करावे लागले.

अशीच स्थिती 'आज का चॅलेंज' आणि 'मै तेरे इश्क में' या चित्रपटांची झाली. 'ब्लॅक ऍड व्हाईट' महाराष्ट्र आणि दिल्लीत टॅक्स फ्री झाल्यानंतरही लोक त्याकडे वळाले नाहीत. दुसर्‍या आठवड्यात मिळालेल्या आकड्यांनुसार चित्रपटाने जवळपास नव्वद लाख रूपयांचा व्यवसाय केला. 'जोधा अकबर' अजूनही मोठ्या शहरांमध्ये चांगला व्यवसाय करीत आहे.

webdunia
PRPR
आठवड्यातील पाच टॉपचे चित्रपट
1. जोधा अकबर (पाचवा आठवडा)
2. ब्लॅक ऍड व्हाईट (दुसरा आठवडा)
3. 10000 बी.सी. (डब-तिसरा आठवडा
4. डॉन नं. 1 (डब-दुसरा आठवडा)
5. तारे जमी पर (तिसरा आठवडा)

Share this Story:

Follow Webdunia marathi