Article Film Review Marathi %e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%ab %e0%a4%87%e0%a4%a8 %e0%a4%85 %e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b 107051700001_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाइफ इन अ मेट्रो

महानगरीय जीवनाचा कॅलिडोस्कोप

लाइफ इन अ मेट्रो चि‍त्रपटाचे परिक्षण
निर्माता : रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक : अनुराग बसू
संगीत : प्रीतम

कलाकार : शिल्पशेट्टी, शायनआहूजा, इरफाखान, धमेंद्र, कंगना, कोंकणसेशर्म

'लाइफ इन अ मेट्रो' हा दिग्दर्शक अनुराग बसू याचा चित्रपट महानगरातील जीवनावर आधारीत आहे. चित्रपटात एकाच वेळी अनेक पात्रांच्या कहाण्या गुंफल्या आहेत. चित्रपटातील पात्रे असमाधानी आहेत. आपल्या एकंदरीत जीवनाबाबत आनंदी नसलेली ही पात्रे सुखाच्या शोधात आहेत.

शीखा (शिल्पा शेट्टी) व रणजीत (के. के. मेनन) यांच्या विवाहास आठ वर्षे पूर्ण होऊनही संसारात सुख नाही. रणजीतचे ऑफिसमधील नेहाशी (कंगना) लफ़डे असते. ऑफिसमधीलच राहूल (शरमन जोशी) नेहावर प्रेम करतोय पण आपल्या भावना तिच्याकडे व्यक्त करू शकत नाही.
राहूललाही जीवनात सर्व काही मिळवायचे आहे. तेही कमी वेळेत. पतीच्या वागणूकीमूळे त्रस्त झालेली शीखा तिला अचानक भेटलेल्या आकाशमध्ये (शायनी आहूजा) प्रेम शोधण्याचा प्रयत्न करते. आकाश त्याच्या पत्नीपासून विभक्त झाला आहे. अमोल (धमेंद्र) चाळीस वर्षांनंतर आपले पहिले प्रेम वैजयंतीच्या (सुहासिनी मुळ्ये) शोधात अमेरिकेतून भारतात परत येतो. आणि या सार्‍या गंभीर कहाण्यांमध्ये कोंकणा सेन व इरफान खानची प्रेमकहाणीही नर्मविनोद निर्माण करते.

या सर्व कहाण्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. महानगरातील जीवनात अस्वस्थ जीवन जगणारी माणसे दाखविताना अनुराग बसूने त्यांच्या मानसिकतेचा शोध फार कमी घेतला आहे. त्यामुळे जे दिसते त्यावर सगळ्या कथा आहेत. अर्थात त्याही प्रभावी ठरल्या आहेत. करीयरच्या मागे धावणार्‍यांच्या गर्दीत मनाला, भावनांना काही स्थान आहे की नाही असा प्रश्न पडत असताना अनुरागने त्या बाजूकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे चित्रपटांच्या गर्दीत मेट्रो लक्षवेधी ठरतो. शीखाचे पात्र बंडाच्या सीमेपासून मागे फिरताना दाखविले असून शेवटी तर ती अगदी पारंपरिक भारतीय स्त्रीसारखी पतीचे सर्व गुन्हे माफ करून त्याला पदरात घेते. चित्रपटाचा शेवट अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवला आहे तेवढा खटकतो.
चित्रपटातील गाणी प्रीतमने अतिशय सुंदर दिली आहेत. पण ही गाणी तीन गायकांच्या माध्यमातून का दाखवली तेच कळत नाही. त्यांचे प्रत्येक गाण्याच्या वेळी होणारे दर्शन हास्यास्पद ठरते. के. के. मेनन, शिल्पा शेट्टी, शर्मन जोशी, शायनी आहूजा यांचा अभिनय छानच. इरफान खान, कोंकणा सेनने झकास काम केले आहे. एका चांगल्या अनुभवासाठी मेट्रो आवर्जून पहावा.




Share this Story:

Follow Webdunia marathi