Article Film Review Marathi %e0%a4%b6%e0%a5%82%e0%a4%9f%e0%a4%86%e0%a4%8a%e0%a4%9f %e0%a4%85%e2%80%8d%e0%a5%85%e0%a4%9f %e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be 107052900001_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला

हिंदी चित्रपट परिक्षण
निर्माता : संजय गुप्ता, शोभा कपूर, एकता कपूर
दिग्दर्शक : अपूर्व लाखिया
संगीत : आनंद राज आनंद, मीका
कलाकार : अमिताभ बच्चन, संजय दत्त, विवेक ओबेरॉय, तुषार कपूर, नेहा धूपिया

मुंबईत नव्वदच्या दशकात लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या चकमकीवर दिग्दर्शक अपूर्व लाखियाने 'शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला' हा चित्रपट बनविला आहे. दिग्दर्शकाने या चकमकीस पोलिसांच्या दृष्टीकोनातून दाखविले आहे. या घटनेवरील जास्तीत जास्त माहिती पोलिसांच्या रेकॉर्डवरून घेतल्याचे लक्षात येते.

सत्य घटनेवर आधारीत चित्रपट माहितीपट बनण्याची शक्यता असते. परंतु, दिग्दर्शक लाखियाने सत्य व काल्पिताचा योग्य वापर करत चित्रपट मनोरंजक बनविला आहे. घटनेच्या सत्य असत्यतेची पडताळणी न करता सर्वज्ञात असलेल्या माहितीचे चित्रपटीय रूपांतर केले आहे.

लोखंडवाला येथील चकमक खरी होती की बनावट याचा निर्णय त्याने प्रेक्षकांवर सोपविला आहे. माया डोळस (विवेक ओबेरॉय) हा कुख्यात गुंड दाऊदसाठी काम करीत असतो. माया प्रस्थापित झाल्यानंतर दाऊदचे कायदे व नियम झुगारून लावतो.

त्याचवेळी पोलिस अधिकारी खान (संजय दत्त) यास खबर्‍याकडून माया लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये असल्याची माहीती मिळते. वास्तविक पोलिसांना स्वत: दाऊदने माहिती दिल्याची चर्चा आहे. तसा आरोपही नुकताच एका गुंडाने केला होता. दिग्दर्शकाने दोन्ही बाजू दाखविल्या आहेत. पोलिस अधिकारी खान याच्या आदेशानुसार लोखंडवाला परिसराची नाकेबंदी करण्यात येते.

सहा तास चाललेल्या चकमकीत सर्व गुंड मारले जातात. अपूर्वने कथानक मनोरंजकपणे मांडले आहे. वकीलासमोर (अमिताभ बच्चन) पोलिस अधिकारी खान, कविराज पाटिल (सुनील शेट्टी) व जावेद शेख (अरबाज खान) बसलेले आहेत. खानवर बनावट चकमक घडवून आणल्याचा आरोप आहे.

खान आपली बाजू मांडतो व कथानक पुढे सरकते. पोलिस दलात काम करणार्‍या अधिकार्‍यांच्या मानवीय पैलूंवर दिग्दर्शकाने प्रकाश टाकला आहे. चित्रपटातील चकमकीची दृश्ये चांगली घेतली आहेत. संजय दत्तने पोलिस अधिकारी खानची भूमिका अप्रतिम साकारली आहे. सुनील शेट्टी व अरबाज खान आपापल्या भूमिकांत ठाकठीक.

विवेक ओबेरॉयने माया डोळसचे पात्र दमदारपणे उभे केले आहे. अभिषेक बच्चन पाहुणा कलाकार आहे. अमिताभची भू‍मिका लहान असली तरी भारदस्त आहे. नायिकांना विशेष वाव नसल्याने नेहा धुपिया, दिया मिर्झा व आरती छाब्रिया यांच्या वाट्याला दोन चार दृश्ये आली आहेत. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सफाईदार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi