Article Film Review Marathi %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87 %e0%a4%a7%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2 %e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8 108012500039_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'संडे' धमाल मनोरंजन

'संडे' धमाल मनोरंजन
IFMIFM
निर्माता- कुमार मंगत- सुनील लुल्ला
दिग्दर्शक- रोहीत शेट्टी
संगीत- संदीप चौटा, सुरूर, दलेर मेहंदी, शिबानी कश्यप, राघव, अमर मोहिले
कलावंत- अजय देवगण, आयेशा टाकिया, अर्शद वारसी, इरफान खान, अंजना सुखानी, तुषार कपूर (पाहुणा कलाकार), इशा देओल (पाहुणी कलाकार)

तेलगू चित्रपट अनुकोंकुडा ओका रोजू या चित्रपटावरून प्रेरणा घेत दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'संडे' बनविला आहे. खून आणि खून्याला पकडण्याचे रहस्य हे सारे या चित्रपटात अतिशय मनोरंजक आणि उत्सुकता वाढवेल अशा पद्धतीने दाखविले गेले आहे. रहस्य शेवटपर्यंत कायम ठेवताना संशयाची सुई सर्वांवर राहील यातही दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.

रोहितने यापूर्वी जमीन व गोलमाल हे चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्या तुलनेत हा चित्रपट चांगला बनला आहे. रहस्य आणि विनोद यांची सरमिसळ चांगली जमली आहे. त्यामुळे 'पब्लिक'ला हा चित्रपट आवडायला हरकत नाही.

webdunia
IFMIFM
या चित्रपटाची कथा साधारण अशी आहे. सेहरच्या (आयेशा टाकिया) आयुष्यातून एक रविवार गायब होतो. याच भोवती सगळे रहस्य गुंफलेले आहे. बल्लू (अर्शद वारसी) व त्याचा दोस्त कुमार (इरफान खान), रितू (अंजना सुखानी) हेही या प्रसंगांच्या ओघात येतात. एसीपी राजवीर (अजय देवगण) या रहस्याचा भेद करतो.

चित्रपटात विनोद आणि रहस्य यांचे चांगले संतुलन आहे. त्यामुळे प्रेक्षक हसता हसता गंभीर होतात. त्यात अनैसर्गिक असे काही वाटत नाही.

रॉबिन भट्ट व तुषार हिरानंदनी यांची पटकथा पहिल्या तासात चांगली बांधून ठेवते. मात्र, मध्यंतरानंतर तिची गती मंदावते. कारण त्यात लांबलचक दृश्ये आहेत. ती कंटाळा आणतात. शिवाय चित्रपटाचा कळसाध्याय फारसा उत्सुकता वाढविणारा नाही.

ढिगभर संगीतकारांनी संगीत देऊनही गाणी फारशी ऐकण्यासारखी नाहीत. त्यातल्या त्यात कश्मकश ठिक आहे.

कलावंतांमध्ये अजय देवगण विनोदी भूमिका चांगल्या करू शकतो, हे त्याने दाखवून दिले आहे. अर्शद वारसी नेहमीप्रमाणे धमाल करतो. इरफान खान 'सरप्राईझ' देतो. आयेशा टाकियाला पाहून ती अभिनय करते असे वाटत नाही. बाकीच्यांची कामे ठीक.

एकूणात संडे पहाण्यासारखा चित्रपट आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi