Article Film Review Marathi %e2%80%98 %e0%a4%b5%e0%a5%80 %e0%a4%86%e0%a4%b0 %e0%a4%ab%e0%a5%85%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80%e2%80%99 110090300017_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘ वी आर फॅमिली’

‘ वी आर फॅमिली’
निर्माता : हीरू यश जौहर, करण जौहर
दिग्दर्शक : सिद्धार्थ पी. मल्होत्रा
संगीत : शंकर-अहसान-लॉ
कलाकार : काजोल, करीना कपूर, अर्जुन रामपाल, आँचल मुंजाल, दिव्या सोनेचा
सेंसर सर्टिफिकेट : यू * 1 घंटा 59 मिनट
रेटिंग : 2.5/5
मागील अनेक दिवसांपासून बॉलिवुड पडद्यावर मोठा फॅमिली ड्रामा पहायला मिळाला नव्हता. एक्शन व रोमँटिक चित्रपटांमुळे प्रेक्षकही कंटाळले होते. बर्‍याच दिवसांनंतर करन जौहरने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पुढ्यात एक कोटुंबिक चित्रपट आणला आहे. हाच वी आर फॅमिली.

अमन (अर्जुन रामपाल) व माया (काजोल) यांना तीन मुलं आहेत. या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. हे तिनही मुलं आपल्या आईकडे म्हणजेच मायाकडे रहात असतात. ती एक परफेक्ट मॉम आहे.

श्रेया (करीना कपूर) शी लग्न करण्‍याचा अमनचा विचार असतो. यासाठी तो माया व मुलांची भेट घालून देण्‍यासाठी श्रेयाला घरी आणतो. मुलं व माया श्रेयाकडे दुर्लक्ष करतात.

अचानक मायाला कळते की तिला असाध्य आजार झाला आहे. मग ती मुलांच्या आयुष्यात श्रेयाला आणण्‍याचा प्रयत्न सुरु करते.

श्रेयासाठी तिचं करियरच सर्वकाही आहे. अखेर ती मुलांना सांभाळण्यास तयार होते. ही या चित्रपटाची कथा आहे. इंग्रजी चित्रपट ‘स्टेपमॉम’चे हे हिंदीतील रुपांतर असून, स्टेपमॉमची अधिकृत परवानगी घेतल्यावर हा चित्रपट तयार करण्‍यात आला आहे.

चित्रपटातील स्क्रिप्टला गती असल्याने तो मुळीच कंटाळवाणा वाटत नाही, परंतु याचा अखेर मात्र टिपिकल फिल्मी असल्याने प्रेक्षक अखेरीस नाक मुरडतात.

दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटातील काही दृश्य अत्यंत भावूक आहेत. चित्रपट एनआरआय दर्शकांना डोळ्यापुढे ठेवत तयार करण्‍यात आला आहे. करण जौहरने या चित्रपटाचे शुटिंग भारताबाहेर केले आहे. ते भारतात केले असते तरी त्याला चाचले असते.

एक्टिंग या चित्रपटातील पॉजेटिव्ह पॉईंट म्हणावा लागेल. केवळ काजोलसाठी हा चित्रपट पहावा. करीना कपूरनेही यात चांगले काम केले आहे. काजोल समोर नकारात्मक भूमिका करण्‍याचे आव्हान तिने यात चांगले पेलले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi