Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘प्यार का पंचनामा 2’

bollywood
, रविवार, 18 ऑक्टोबर 2015 (22:17 IST)
2011 साली प्यार का पंचनाङ्काला हा सिनेमा दिग्दर्शक लव रंजन यांनी केला होता. पुन्हा दोन वर्षानी ‘आकाश-वाणी’ हा सिनेमा घेऊन ते आले, पण हा सिनेमा फ्लॉप ठरला. आता 2015 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या सिनेमाचा सिक्वल ‘प्यार का पंचनामा 2’ घेऊन ते पुन्हा सिल्वर स्क्रिनवर दाखल झालेत.
 
गोगो, चौका आणि ठाकूर या तीन मित्रांची ही गोष्ट.. या तिघांच्या आयुष्यात चिकू, सुप्रिया आणि कुसुम या मुली असतात.. या तिन्ही जोडय़ांची लव्हस्टोरी, जरा विनोदी ढंगानं यात रेखाटण्यात आलीय. मुलं जेव्हा बॅचलर असतात तेव्हाचं त्यांचं आयुष्य आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यात एक मुलगी येते तेव्हा काय होतं.. अशा काहीशा बॅकग्राउंडवरचा हा 
 
सिनेमा आहे.. या सिनेमातला या तिन्ही जोडय़ांचा परफॉर्मन्स चांगला झालाय. अभिनेता सनी सिंगचा कॉमेडी टाइमिंग कमाल आहे. खरं तर ‘प्यार का पंचनामा 2’हा एक अडल्ट कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमातल्या तीनही अभिनेत्रींना अनेक बोल्ड सीन देण्यात आलेत, जे या तिघींनीही सहज पार पाडलेत. सिनेमातली गाणी सिनेमाच्या थीमप्रमाणे आहेत हे तर खरं पण अनेक गाणी अशी ही आहेत ज्यांची सिनेमात गरजच नव्हती. अशा गाण्यांमुळे सिनेमाच्या गतीवर याचा परिणाम होतो. या 
 
सिनेमाची जी गोष्ट खटकते ती म्हणजे या सिनेमाची लेन्थ.. काही नको असलेल्या सीन्स आणि गाणंमुळे सिनेमा बोर वाटू लागतो.. पहिल्या सिनेमाच्या तुलनेत या सिनेमात खूप काही नावीन्य पाहायला मिळतं तर तसंही नाही. हो पण सिनेमा मात्र टाइमपास एन्टरटेन्मेंट आहे एवढं नक्की..

Share this Story:

Follow Webdunia marathi