Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॅपी बर्थ डे अक्षय.. (स्लाईड-शो)

अक्षयचे पाच हिट चित्रपट

हॅपी बर्थ डे अक्षय.. (स्लाईड-शो)
9 सप्टेंबर 1967 मध्ये जन्मलेल्या अक्षय कुमार आज आपल्या वयाची 41 वर्षे पूर्ण करत आहे. 18 वर्षाच्या करियरमध्ये अक्षयचे अनेक चित्रपट हिट झाले. ज्या भूमिकांमुळे तो गाजला, त्या चित्रपटांपैकी पाच हिट चित्रपटांवर आपण नजर फिरवूया.....

IFMIFM


खिलाडी (1992)
अक्षय कुमारचा हा पहिला हिट चित्रपट होता. 16 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटामुळेच अक्षयला आजदेखील खिलाडी कुमार म्हटले जाते. या चित्रपटानंतर त्याचे सबसे बडा खिलाडी, मैं खिलाडी तू अनाडी, इंटरनेशनल खिलाडी आदी चित्रपट प्रदर्शित होऊन हिट झाले. अक्षय कुमार, दीपक तिजोरी आणि आयशा जुल्का सारख्या कलाकारांना घेऊन दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी ऍक्शन, सस्पेंस आणि थ्रिलरचा मेळ घालून अशी निर्मिती केली की प्रेक्षक थक्क झाले. यानंतर अक्षयने मागे वळून पाहिलेच नाही.

webdunia
IFMIFM


खिलाडि़यों का खिलाड़ी (1996)

या चित्रपटामध्ये अक्षयचे नाव अक्षय मल्होत्रा असे होते. त्यातील ‘ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हिरो के
बच्चे, हम हैं सीधे-सादे अक्षय’ या गीताने तर अक्षयची वेगळी अोळख निर्माण झाली.
‘खिलाडि़यों का खिलाड़ी’ या मध्ये केवळ मालमसाला होता. उत्कृष्ट लोकेशन, गाणी आणि केवळ स्टायलिश ऍक्शनने अक्षयने धम्माल उडवून दिली. रेखा आणि रवीनासारख्या नायिकांबरोबर रोमांस करीत अक्षयने आपल्या वेगळ्या स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकली.

webdunia
IFMIFM


हेराफेरी (2000)

प्रत्येक चित्रपटामध्ये हाणामारी करणा-या अक्षयला या चित्रपटाने विनोदी भूमिका रंगविण्याची संधी दिली. बदलत्या
काळानुसार बदलत अक्षय कुमारने आपल्या पारंपरिक भूमिकांना फाटा दिला. अक्षय चे स्टार्स इतके ताकदीचे होते की, त्याला प्रियदर्शन यांनी ‘हेराफेरी’ चा प्रस्ताव दिला. या संधीचे सोने करत त्याने एकच धम्माल उडवून दिली. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याचा विनोदी स्वभावही उलगडला गेला.

webdunia
IFMIFM


मुझसे शादी करोगी (2004)

डेविड धवन दिग्दिर्शित या चित्रपटामध्ये अक्षय सनीच्या भूमिकेत आहे. चित्रपटात सलमान खान पण आहे. सल्लू
अक्षयपेक्षा सरस ठरला हे खरे आहे पण, अक्षयने अपेक्षेपेक्षा प्रभावशाली अभिनय केला. अक्षयने एका सामान्य व्यक्तीची
भूमिका इतक्या आत्मविश्वासाने दाखविली की, ती आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

webdunia
IFMIFM


सिंह इज़ किंग (2008)

‘सिंह इज़ किंग’ चे नाव या सूचीमध्ये पाहून आपण अचंबित व्हाल. भलेही या चित्रपटावर मोठा वादंग झाला. मात्र,
त्यातील अक्षयच्या भूमिकेला सलाम करणा-यांची संख्याही तेवढीच होती. हा चित्रपट अक्षयच्या जीवनातील मैलाचा दगड
म्हणण्यास काहीच हरकत नाही. कारण या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाने सध्या तोच सुपर स्टार असल्याचे सिद्ध केले
आहे. आपल्या अभिनयाने फालतू चित्रपटातही रस निर्माण करणा-या अक्षने फिल्मइंडस्ट्रीजमध्ये खान साम्राज्यालाही
जोरदार धक्का दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi