आपल्या देशात परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी सारेच देश प्रयत्नशील आहेत. यात अमेरिका, भारत, ब्रिटन, जर्मनी आदी देशांचा समावेश आहे. आता ऑस्ट्रेलियानेही परदेशी विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली असून, यासाठी भारतातही तेथील काही संस्था, विद्यापीठे आपल्या जाहिराती करत आहेत.
अमेरिकेच्या मानाने ऑस्ट्रेलियात भारतीयांसाठी अत्यंत कमी आणि सुलभ दरात शिक्षण उपलब्ध आहे. फक्त त्यासाठी प्रवेश परीक्षेचा चक्रव्यूह भेदावा लागतो. विविध विद्यापीठांमार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत तुम्ही उनुत्तीर्ण झालात तर तुम्हाला प्रवेश मिळणे अशक्य आहे. येथील विविध विद्यापीठे आणि संस्थांमध्ये प्रवेश पूर्व परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
इंग्रजी अत्यावश्यक
ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी तुम्हाला इंग्रजी येणे गरजेचे आहे. तुमची प्राथमिक भाषा इंग्रजी असावी किंवा तुमचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असावे किंवा तुमची या भाषेवरती चांगली पकड असणे गरजेचे आहे.
आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या आयईएलटीएम अर्थात इंटरनॅशनल लँग्वेज टेस्टिंग सिस्टिम अंतर्गत तुम्हाला या परीक्षेत किमान 6 पर्यंत तरी गुण मिळवणे गरजेचे आहे. टेफ या परीक्षेचेही हेच मापदंड आहेत. ब्रिटिश काउंसिलद्वारे ही परीक्षा घेतली जाते. टी. ओ. ई. एफ्. एल. (अमेरिकन टेस्ट ऑफ इंग्लिश एज ए फॉरेन लँग्वेज) साठीही हेच नियम लागू आहेत. व्हिजा कार्यालयानेही इंग्रजी भाषेसंदर्भात अशीच परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही आधुनिक शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. परंतु अमेरिकेच्या मानाने येथे शिक्षण कमी खर्चिक आहे. तसेच येथील शिक्षणाचा दर्जाही चांगला आहे. ऑस्ट्रेलियात शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे.
या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेऊ शकता:
हयूमॅनिटीज - इंग्लिश, फिलॉसॉफी, हिस्ट्री, इथनिक स्टडीज, फॉरेन लँग्वेज स्टडीज, रिलीजियस स्टडीज, कम्युनिकेशन, वूमेंस स्टडीज.
शिक्षण (एज्युकेशन) - एज्युकेशन स्टडीज, टीचिंग.
समाजशास्त्र (सोशल स्टडीज) - ज्यॉग्राफी लाइब्रेरी एड आर्काइवल स्टडीज, बिहेवियोरल स्टडीज, वेलफेयर एड काउंसलिंग, स्पोर्ट एड रीक्रिएशन, योविटिकल साइंस, सोशियोलॉजी.
- गणित आणि कंप्युटिंग - मॅथेमेटिक्स एड स्टॅटिस्टिक्स, कॉम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सायंस, कॉम्प्युटर सायंस.
- सायंस - बायॉलॉजिकल सायंसेस, फिजिक्स अर्थ सायंसेस, फार्माकॉलोजी वेटेनरी सायंस, एनिमल हसबेंड्री, केमिस्ट्री.
- व्ह्यिज्युअल एड परफॉमिंग आर्ट्स - आर्ट, ग्राफिक आर्ट्स, फॅशन डिझाइन, क्राफ्टस, परफॉर्मिंग आर्ट्स, म्युझिक.
- इंजिनियरिंग - केमिकल, सिविल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, स्ट्रक्चरल, मॅकेनिकल, ऑटोमोटिव, एयरोनॉटिकल, माइनिंग,
इंडस्ट्रियल, जनरल इंजिनियरिंग, कॉम्प्युटर इंजिनियरिंग, टेलीकम्यूनिकेशंस. बिझनेस एडमिनिस्ट्रेशन अँड लॉ - इकॉनॉमिक्स, एकाउंटिंग, कॉमर्स, मॅनेजमेंट, एडमिनिस्ट्रेशन, सेक्रेटियल स्टडीज, सेक्स एड
सर्विसेज, लॉ जस्टिस, लीगल स्टडीज.
हेल्थ अँड सायंसेस - मेडिक्स एड थेराप्यूटिक टेक्नोलॉजी, नर्सिंग, न्यूट्रीशन, मेडिकल सायंस, इनवायरमेंटल हेल्थ, ऑप्टोमेट्री,
पर्सनल एड फॅमिली हेल्थ केयर.
एग्रीकल्चर - एग्रीकल्चर, फॉरेस्ट्री पार्क्स एड वाइल्ड लाइफ.
व्यावसायिक अभ्यासक्रम
टेक्नीकल अँड फर्दर एज्युकेशन (टेफ) सह खासजी ट्रेनिंग संस्थांद्वारा हा अभ्यासक्रम घेतला जातो. यात सरकारच्या नियंत्रणाखाली टेफची परीक्षा घेतली जाते. यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
निवास व्यवस्था
परदेशी विद्यार्थ्यांसाठी ऑस्ट्रेलियात रहाण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यात कॉलेजचे हॉस्टेल, हॉल ऑफ रेसींडन्स, कॅपस हाऊसिंग, किंवा मग तुम्ही पेईंग गेस्ट म्हणूनही राहू शकता. समाधानाची बाब म्हणजे अमेरिकेप्रमाणे इथे विद्यार्थ्यांवर अधिक बंधनं नाहीत. इथे तुम्ही पार्ट टाइम जॉबही करू शकता. आठवड्याला 20 तास असा याचा कालावधी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
ऑस्ट्रेलियन एज्युकेशन सेंटर, ऑस्ट्रेलियन हाय कमिशन, 1/50, जी, शांती पथ, चाणक्यपुरी, नवी दिल्ली -21, फोन-
6888223, एक्स्टेन्शन- 408