Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मैत्रीचा नवा प्लॅटफॉर्म

मैत्रीचा नवा प्लॅटफॉर्म
गौतम बेस्ट स्टुडंट म्हणून ओळखला जातो. अभ्यासातच नव्हे तर तो खेळातही तरबेज आहे. करंट अफेअर्सबाबत प्रश्नांचे उत्तर त्याला मुखपाठ असतात. या सर्वांचे श्रेय तो इंटरनेटच्या माध्यमातून बनलेल्या मित्रांद्वारे दिल्या गेलेल्या माहितीला मानतो. तो म्हणतो, अमेरिका, युरोपमध्येही त्याचे मित्र आहेत जे इंटरनेटच्या माध्यमातून जुळले आहेत. नेटवर मित्रांशी क्लासमधील गप्पा, खेळापासून तर करंट अफेअर्स चर्चा तो करतो. पण गौतम सध्या एका संकटात फसला आहे. एका ई-फ्रेंडने चॅटिंगदरम्यान गौतमला काही चुकीच्या गोष्टी सांगणे सुरू केले ज्यामुळे काही चुकीच्या सवयींच्या जाळ्यात फसला. त्याला केलेल्या चुकीची जाणीव झालेली असून त्याने स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे म्हणजेच ई-फ्रेंडशिपमध्ये काही गोष्टी चांगल्या तर काही वाईटही आहेत म्हणून याचा वापर दक्षतापूर्वक केला गेला पाहिजे.

 

पुढे पहा ई-फ्रेंडशिप....


ई-फ्रेंडशि

webdunia

WD

ई-फ्रेंडशिप सोशल नेटवर्किंग साईट्सद्वारे केली जाते. टेक्निकल वर्डसमध्ये सांगायचे झाल्यास हे एक असे सॉफ्टवेअर आहे ते जगभरातील कुठल्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी मैत्री करायला मदत करते. म्हणजेच इंटरनेटवर सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून आपण जगातील कुठल्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी चॅटिंग, व्हिडिओ कॉंफरन्सिंग किंवा मेलच्या माध्यमातून मैत्री करू शकतो.

पुढे पहा सोशल नेटवर्किंग सर्व्हिस....


सोशल नेटवर्किंग सर्व्हिस

webdunia

WD

सोशल नेटवर्किंगच्या अनेक साईट्स आहेत यात प्रमुख फेस बुक, लिंकेडीन, ऑर्कूट इत्यादी. फेस बुक, लिंकेडिनपेक्षा ऑर्कूट भारतीय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. भारत असा दुसरा देश आहे जेथे ऑर्कूट साईट सर्वात जास्त क्लिक केली जाते. यातील कुठल्याही साईटवर तुम्ही आपले अकाउंट ओपन करू शकता आणि जगभरात कुठेही मित्र बनवू शकता.

पुढे पहा कसे बनवाल ई- फ्रेंड्‍स....


कसे बनवाल ई-फ़्रेंड्

webdunia

WD

ई-फ़्रेंड बनविण्यासाठी सर्वात आधी आपला ई मेल आयडी बनविणे आवश्यक आहे. ऑर्कूटवर अकाउंट ओपन करायचे असेल तर ही साईट गूगलद्वारे चालविली जाते. येथे नवनव्या व्यक्ती आणि त्याशी संबंधित माहिती आपल्या साईटवर उपलब्ध करू शकता. याशिवाय हा आपले जुने मित्र आणि त्यांशी संबंधित माहिती ठेवायला मदत होते. या साईटवर आपला फोटो, हॉबिज, क्वालिफिकेशन, प्रोफेशन इत्यादी माहिती उपलब्ध करून देतो. साईटवर उपलब्ध माहितीच्या माध्यमातून आपण नवनव्या व्यक्तिंशी चॅटिंग, व्हिडिओ कॉंफिरन्सिंगच्या माध्यमातून फ्रेंडशिप करू शकता.

पुढे पहा कुठे आहे धोका...


कुठे आहे धोका

webdunia

WD

कधीकधी काही व्यक्ती या साईट्सवर चुकीची माहिती देतात. उदा. कुठली ५० वर्षीय प्रौढ व्यक्ती स्वतःला समवयस्क सांगून चुकीचे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करू शकते किंवा एखादी व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातून चांगली मैत्री करून नंतर चुकीच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करू शकतो.

पुढे पहा ई- फ्रेंडशिप कितपत योग्य...


ई- फ्रेंडशिप कितपत योग्

webdunia

WD

इंटरनेटवर जगभरातील माहितीचा खजाना आहे. ऑनलाईन कम्युनिटी (ई-फ्रेडस) तयार करण्यामुळे आपल्याला मनोरंजनासोबतच माहितीचा लाभ मिळतो पण कॉम्प्युटरसमोर जास्तीत जास्त वेळ घालविल्यामुळे मस्तिष्कच नव्हे तर झोपेची मात्रा, चिडचिडपणा, लहान वयातच तणाव आदी समस्यांनी प्रभावित होते. तर दुसरीकडे अनेकदा कुठली साईट आपल्यासाठी तर कुठली साईट वाईट याचा अंदाज येत नाही तेव्हा जरा सावधान!


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi