Duryodhan Karan Friendship एक खरा मित्र कोण असतो, अंधपणे मैत्री निभावणारा मित्र की आपल्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करणारा मित्र?
जेव्हा आपण मैत्रीबद्दल बोलतो तेव्हा कृष्ण-सुदामा, कृष्ण-अर्जुन ह्यांच्यासारखे अनेक उदाहरण आपल्याला आठवतात. पण एक मैत्रीचा उदाहरण असं आहे जे कमी लोकांना माहित आहे किंवा त्याचे उल्लेख केले जात नाही. होय आपण बोलत आहोत कर्ण-दुर्योधन ह्यांच्या मैत्रीबद्दल.
कर्ण आणि दुर्योधन ह्यांच्या मैत्रीची सुरुवात गुरु द्रोणाचार्यांच्या आश्रमात झाली होती. प्रसंग होता कुरु राजकुमारांच्या पदवीदान समारंभाचा. सगळ्यांनी आपल्या शौर्याचे प्रदर्शन केले पण सगळ्यांना प्रतीक्षा होती अर्जुनाच्या धनुर्विद्या बघण्याची. अर्जुनाने धनुर्विद्या दाखवल्यानंतर कर्ण पुढे आले आणि त्यांनी अर्जुनाला त्यांच्याशी मुकाबला करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र गुरु द्रोण यांनी हा प्रसंग हे म्हणून टाळून दिला की कर्ण एक राजपुत्र नाही. त्यावेळी जाती व्यवस्थेनुसार एका राजपुत्राशी कोणी साधारण मनुष्य लढू शकत नव्हतं. बरोबरीच्या लोकांमध्येच स्पर्धा होत असे.
ह्या प्रसंगी जेव्हा कर्णाला खूप वाईट वाटत होतं कोणीही त्यांसोबत उभं नव्हतं तेव्हा दुर्योधन पुढे आला आणि कर्णाला अंग देशाचं साम्राज्य देऊन राजा बनवण्याचं जाहीर केलं. हे बघून कर्ण यांच्या मनात असा भाव आला कि जो मान, संधी, प्रेम कोणीही त्याला दिलं नाही ते दुर्योधनाने दिलं.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य होऊन कधी राजा ना होऊ शकण्याचा विचार दुर्योधनाने त्यांना अंगराज बनवून पूर्ण केला. यानंतर अंगराज कर्ण आजीवन दुर्योधनाचा आभारी असून एक खरा मित्र बनला आणि त्यासोबत उभं राहून वेळोवेळी आपली मैत्री सिद्ध केली.
महाभारताच्या युद्धाच्या काही दिवसांपूर्वी जेव्हा श्रीकृष्णाने कर्णला तो कुंती देवीचा पुत्र असल्याची माहिती दिली आणि पांडव त्याचे भाऊ असल्याचे सांगत कौरवांविरुद्ध युद्ध लढण्याची संधी दिली तेव्हा देखील कर्णाने जराही विचलित न होता आपल्या मित्र दुर्योधनाची साथ सोडली नाही.
असे ही मानलं जातं की दुर्योधनाने आधी कर्णला अर्जुन विरुद्ध वापरण्यासाठी मैत्री केली मात्र नंतर तो ही त्या मैत्री संबंधात मनापासून बांधला गेला होता.
कर्ण खूप शूर होता, म्हणून तो दुर्योधनाला योद्ध्याप्रमाणे लढायला शिकवत असे. ज्या वेळी दुर्योधनाने आपल्या मामा शकुनीच्या प्रभावाखाली पांडवांचा विश्वासघात करण्याचा विचार केला, तेव्हा कर्णाने त्याला भित्रा म्हणून फटकारले. एकदा दुर्योधनाने पांडवांना जाळून मारण्यासाठी लक्षगृह बांधले तेव्हा कर्णाला याचे फार वाईट वाटले. कर्ण म्हणाला, "दुर्योधन, तू युद्धभूमीवर तुझ्या पराक्रमाचे प्रदर्शन कर, कपटाने तुझ्या भ्याडपणाचे नाही."
अधर्म करण्यापासून रोखू शकला नाही
महाभारतात दुर्योधन आणि कर्ण हे मित्र होते. दुर्योधनाने कर्णाला आपला जिवलग मित्र मानले आणि त्याला योग्य मान दिला. यामुळे कर्ण दुर्योधनाला अधर्म करण्यापासून कधीच रोखू शकला नाही आणि त्याला साथ देत राहिला. तर खरा मित्र तोच असतो जो अधर्म करण्यापासून थांबतो. मैत्रीत ही गोष्ट लक्षात ठेवली नाही तर विनाश निश्चित आहे. महाभारतात दुर्योधनाच्या चुकांमुळे त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले. कर्णाला धर्म आणि अधर्म माहीत होता, पण त्याने दुर्योधनाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. जर कर्णाने आपल्या मित्राला त्याने घेतलेले वाईट निर्णय आणि अहंकाराबद्दल सांगितलं असतं तर कदाचित अधर्म होण्यापासून वाचू शकलं असतं.