तुझं माझं हितगुज, महाराजा कुणा सांगू नको,
काय म्हणते मी तुला, कळू देऊ नको,
मोठे मोठे शब्द मजजवळ नाहीत,
तुला हाक मारण्या अजून काही सुचत ही नाही,
भाव माझे तू नीट नेहमीच ओळखतो,
मला संकटातुन सदाच सोडवितो,
माझ्यापरी तुझे लाखो भक्त ठाव आहे मला,
सगळ्यांचा तुची त्राता, तुझी भक्ती सर्वाला,
साधा भोळा माझा तू सांब सदाशिव ,
अवतार घेऊन आलासी, आणि काय हवं!
निशिदींनी देवा तुझी सेवा घडो हातून,
नाव तुझे राहो ओठी, पाय लागो शेगावी एकदा वर्षातून!
..अश्विनी थत्ते.