Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विसर्जन मार्गावर गणपती पुढे सोडण्यावरून वाद, काही काळ गोंधळ

kolhapur ganaptai
, शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (13:36 IST)
कोल्हापूर शहरातील मुख्य विसर्जन मार्गावरील मिरजकर तिकटीला गणपती पुढे सोडण्यावरून वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ झाला होता. त्यामुळे काहींनी रस्त्यांवरच ठिय्या मांडला.
 
मुख्य मिरवणूक मार्ग महाद्वार रोडवर प्रत्येक मंडळाला एक तासाची परवानगी असल्याने अनेक मंडळाकडून त्या दिशेने येणाऱ्या मंडळांची रांग लागली आहे. मिरजकर तिकटी येथून नंगिवली आणि पीटीएम ही दोन मंडळे मुख्य मार्गावर आल्यानंतर प्रतीक्षा करूनही मुख्य मिरवणुकीत प्रवेश मिळत नसल्याने देवल क्लबकडून येणाऱ्या मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले. यावेळी मिरवणूक रेंगाळू देऊ नका अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. मिरवणूक रेंगाळल्याचे दाखवल्यानंतर पोलिसांनी मिरवणूक पुढे मार्गस्थ केली. तेव्हाच मिरजकर तिकटी येथून एका मंडळाने पुढे येण्याचा प्रयत्न करताच कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यामुळे गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Prashtapadi Poornima Shraddha 2022 श्राद्ध पौर्णिमा : प्रष्टपदी पौर्णिमा श्राद्ध