बा गणेशा, तुजला मज काही सांगायचे होते!
थोडस काही हितगुज करायचे होते.
तुझ्या पासून तर काही बाप्पा लपले नाही,
सर्वव्यापी आहेस तू, कसं लपवाव तुझ्या पासून काही?
बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा,
द्यावी चांगली बुद्धी प्रत्येक माणसा, कर उद्धार त्याचा,
संगत वाईट, कुकर्म करतो,सतत खोटे बोलतो,
फसवणूक , नारीवर अत्याचार सतत तो करतो,
जरा ही भीती नाही रे त्याला, त्याच्या पापाची,
रोजच काही अनाचार करतो, हीच दुनिया त्याची,
त्रस्त जाहले सकळ या मानवरूपी दैत्यास,
दे कडकडीत शासन त्यांना, वाचव भल्या माणसास,
भक्ती भाव त्याचा फक्त दाखवण्यापूरता उफाळून येतो,
दाखवण्यात मजा फक्त त्याला, मनांने खरंच कोण पूजतो?
सर्वत्र देवळांमध्ये गोंधळ दिसतो उघड्या डोळ्याने,
व्यापार करतात रे सगळे, तुझ्याच नावाने!
थांबव सर्वच दुष्टकृत्य तू,दाखव तुझा माहीमा.
होतील सारेच दुष्ट शासित, मगच मिळेल शांती आम्हा!