डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी, तसेच क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी कंपनी ब्रॅण्ड पेटीएमला दोन वर्षांच्या अंतरानंतर परतत असलेला मुंबईचा सर्वात जुना व सर्वात लोकप्रिय लालबागचा राजा उत्सवासाठी विशेष अधिकार देण्यात आले आहेत. कंपनी आपल्या अॅपवर बाप्पाचे लाइव्ह दर्शन प्रसारित करणारे एकमेव व्यासपीठ असेल. तसेच बाप्पाचा प्रसाद आणि मंडळाला दान देण्याची सुविधाही एका क्लिकवर उपलब्ध असेल.
पेटीएम सुपर अॅपसह देशात कुठूनही ड्रायफ्रूट प्रसाद ऑर्डर करता येऊ शकतो आणि हा प्रसाद २ ते ५ दिवसांमध्ये डिलिव्हर करण्यात येईल. हा प्रसाद २५० ग्रॅमसाठी ४०० रूपये स्वरूपात ऑर्डर करता येऊ शकतो. ऑर्डर करण्यासाठी पेटीएम अॅप होम पेजवरील गणेश उत्सव आयकॉनवर क्लिक करावे.
कंपनीने मंडळाला भेट देणाऱ्या नवीन वापरकर्त्यांसाठी आकर्षक ऑफर्स लॉन्च केल्या आहेत. पेटीएम अॅप डाऊनलोड केल्यानंतर नवीन वापरकर्ते लालबागचा राजा मंडळामध्ये असलेले क्यूआर कोड स्कॅन करत ५१ रूपये दान करू शकतात, तसेच त्यांना याच रक्कमेच्या कॅशबॅकसोबत प्रसादाचे लाडू मिळतील. मंडळाला भेट देऊ न शकणारे नवीन वापरकर्ते ऑनलाइन प्रसाद ऑर्डर करू शकतात आणि त्यांना देखील ५१ रूपयांची कॅशबॅक मिळेल. पेटीएम अॅपवर दिवसातील सर्वोच्च दान करणाऱ्या वापरकर्त्याला स्पेशल व्हीआयपी दर्शनासाठी कपल एण्ट्री पास मिळतील.