गणेशोत्सव अवघ्या काहीच तासांवर आले असून आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी लोकांमध्ये भारी उत्साह आहे. सार्वजनिक मंडळ असो किंवा घरगुती गणपतीचे स्वागत करण्यासाठी सर्वांमध्ये मोठा उत्साह असून सर्व बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज आहे. मुंबईचे श्रद्धास्थान असलेले लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन 15 सप्टेंबर पासून सुरु झाले आहे. यंदाचे वर्ष लालबागच्या राजाचे 90 वे आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबाग तर्फे 90 व्या वर्षीचे गणेश पूजन जून मध्ये संकष्टी चतुर्थीला करण्यात आले होते. तर गणेशोत्सवाच्या मंडपाचे पूजन जुलै मध्ये झाले. आता लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन 15 सप्टेंबर पासून सुरु केले आहे. लालबागच्या राजाचा देखावा दरवर्षी बघण्यासारखा असतो. यंदाच्या देखावा राज्याभिषेक सोहळ्याचा करण्यात आला आहे.
गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी भाविक दूरवरून येतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेतात. लालबागच्या राजाला भाविकांची गर्दी असते लोक तासंतास रांगेत उभारून आपल्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तयार असतात.