Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आधी वंदु तुज मोरया

- पूज्य पांडूरंगशास्त्री आठवले

आधी वंदु तुज मोरया
भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र 'गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष कानी पडतो. मोरया म्हणजे नमस्कार. अर्थात गणपती बाप्पा मोरयाचा अर्थ गणपतीस दंडवत असा होतो. गणेशाचा मोरेश्वर नावाचा भक्त होऊन गेला. त्यावरून हा मोरया शब्द रूढ झाला असावा.


' मद्‍ भक्तांनाच ये भक्ता: ते प्रियतमा मता:।।
अर्थात माझ्या भक्तांचे भक्त मला अधिक प्रिय आहे. परमेश्वरानेच स्वत: असे म्हटले आहे. त्यामुळेच मोरया हे नाव गणपती सोबत जोडण्यात आले असावे. गणेश चतुर्थी, गणरायाची चतुर्थ अवस्था तुर्यावस्थेपर्यंतची सिद्धीच सूचित करते. चंद्र मनाचा परमेश्वर आहे. 'चंद्रमा मनैसो जात.। चंद्र कलेकलेने वाढतो व घटतो. मनाचेही तसेच आहे. तुर्यावस्थेपर्यंत पोहचण्याची इच्छा ठेवणार्‍या मनुष्याचे मन चंचलतेचे दास होता कामा नये. मनाच्या आधीन झाल्यास तो अध:पतनाचा मार्ग समजावा.

webdunia
WD

कोणत्याही आईस आपल्या मुलाचे नको असेच गणपतीचे रूप आहे. मात्र तरीही आपल्या ऋषीच्या दृष्टीने गणपतीचे महत्व अगाध आहे. कोणत्याही शुभकामास त्याच्या पूजनानेच सुरूवात होते. प्रसंग कोणताही असो, लग्नकार्य, लक्ष्मीपूजन, भूमीपूजन. मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा या सर्वांत गणपतीचे पूजन आवश्यक आहे. गणपतीची मूर्ती असायलाच पाहिजे असे नाही, सुपारीचा गणपती केला तरी चालेल. मात्र, प्रथम पूजन होणार ते गणपतीचेच. पुराणकथेनुसार गणपतीचे डोके उडवल्यानंतर पार्वतीस प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवसंकराने आपल्या एका गणास चांगले शिर शोधण्यास पाठवले. तो हत्तीचे डोके घेऊन आला. गणपतीच्या धडावर ते ठेवल्यावर तो जिवंत झाला. अशाप्रकारे गणपतीचा गजानन झाला.

webdunia
WD


पुराणातील भाषा भावगर्भित व लक्षणात्मक रूपकांनी समृद्ध आहे. बुद्धिमान लोक भावार्थ समजून घेतात. तर इतर कथेच्या रूपात आनंद घेतात. भगवान शिवाने हत्तीचे डोके धडावर बसवले मग गणेशाचेच का नाही बसवले? गणपति ज्ञानाची देवता असून समाजाचे नेतृत्व त्यांच्या हाती असल्याचे पुराण सांगते. कारण संकुचित वृत्तीचा मानव महान तत्वज्ञानी किवा लोकप्रिय पुढारी नाही होऊ शकत. गण-पती म्हणजेच समूहाचा नेता. त्याचप्रमाणे तो गुणपतीही आहेच. पुढारी व तत्ववेत्यात कोणते गुण असायला पाहिजे, याचे गणपति मूर्तीमंत प्रतीक आहे. त्याच्याजवळ बाह्य सौदर्य नसले तरी आंतरिक सौदर्याचे भांडार आहे.

webdunia
WD


गणपतीचे डोके हत्तीचे असण्याचेही कारण आहे. हत्ती प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. समाजाचे मार्गदर्शन करून योग्य दिशा देण्याचे अभिप्रेत असलेला पुढारी निर्बुद्ध असून कसा चालेल? हत्तीचे कान सुपासारखे असतात. सूप टरफले फेकून अन्न (सत्व) ठेवते. ऐका सर्वांचेच मात्र सारग्रहण करून निरूपयोगी गोष्टींना बाजूला सारले पाहिजे. मोठे कान उत्कृष्ट श्रवण-भक्तीचे सूतोवाचही करते. त्याचे छोटे डोळे आपणांस सूक्ष्म दृष्टी अंगिकारण्याची प्रेरणा देतात. हत्तीकडे सुईसारखी सुक्ष्म वस्तूही शोधण्याची दृष्टी असते. आपणासही बारीक नजर ठेवून अनावश्यक गोष्टींना हद्दपार करता यायला पाहिजे. त्याची सूक्ष्म दृष्टी दीर्घदृष्टीचेही प्रतीक आहे. त्याद्वारे हत्ती व्यक्तीचे भविष्य वाचू शकत असल्याचे मानले जाते. त्यामुळेच निपुत्रिक राजा वारल्यास त्याचा उत्तराधिकारी नियुक्त करण्यासाठी हत्तीणीच्या सोंडेत हार घालून फिरविण्यात येत असे. ज्याच्या गळ्यात माळ पडेल त्यास राजा नियुक्त करण्यात येत असे.

webdunia
WD


हत्तीची घ्राणेंद्रियेही अत्यंत तीक्ष्ण असतात. पुढारी व ज्ञानी पुरूषाच्या अंगी दूरदृष्टी असणे आवश्यक आहे. भविष्यातील बदल टिपणारी दृष्टी त्यांच्याकडे हवी. गणपतीस दोन दात आहेत. एक पूर्ण व दुसरा अर्धा. पहिला श्रद्धेचा तर दुसरा मेधाचा आहे. जीवनविकासाकरिता आत्मश्रद्धा व ईश्वरश्रद्धा असणे आवश्यक आहे. मेधा कमी असल्यास चालेल मात्र गुरू व परमेश्वराप्रती श्रद्धेस तडा जाता कामा नये. त्यास चार हात आहेत. अंकुश, पाश, मोदक व आशीर्वाद त्यामध्ये असतो. विषयवासनेवर ताबा मिळवणे आवश्यक असल्याचे अंकुश सुचवतो. आवश्यकता भासल्यास इंद्रियांना दंड करण्याचे सामर्थ्य ज्ञानी व नेतृत्व करणार्‍या पुरूषाने अंगी बाणवणे आवश्यक असल्याचे त्यातून प्रतीत होते. मोदक म्हणजे आनंद देणारा पदार्थ. बौद्धीक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील धुरीणांचा आहार सात्विक असायला पाहिजे. व्यापक अर्थाने बघितल्यास प्रत्येक इंद्रियांचा आहार सात्विक असायला पाहिजे. मोदक तत्वज्ञानाचे प्रतीक आहे. बाहेरून त्याची चव कळत नसली तरी आतून तो गोडच असतो. आपल्या कर्माचे मोदक प्रभूच्या हातात देणार्‍यास परमेश्वर आशीर्वाद देतो. चौथ्या हातातून हेच सूचित होते.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi