गणपतीचे विविध नाव व त्यांचे अर्थ
तरुण - शाश्वत
गजेंद्र - गजराज
अमित - सर्वोत्तम
भुपती - देवांचा राजा
बुद्धीदाता - बुद्धीचा देवता
तामिळनाडूत आजही गणपतीला ब्रह्मणस्पती म्हणतात.
नंदना - शंकराचा पुत्र असल्याने त्याचे नाव नंदना पडले.
शंभवी - पार्वतीचे पुत्र असल्याने त्याचे नाव शंभवी पडले.
विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपती असा आहे.
विनायक - शब्दाचा अर्थ म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे.
धूम्रकेतु - द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा.श्वेता - पांढर्या रंगासारखा पवित्र असल्यामुळे याचे नाव श्वेता पडले. रुद्रप्रिया - भगवान शिवचे प्रिय असल्यामुळे त्याचे नाव रुद्रप्रिया पडले. विकट -विकट नावाचा प्रसिद्ध अवतार कामासुराचा संहारक आहे. मयूर त्याचे वाहन आहे.महोदर - महोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा. याचे मूषकवाहन आहे . गजानन - गजानन अवतार सांख्यब्रह्म धारक आहे. त्याला लोभासुर आणि मूषक वाहन असेही म्हटले आहे. गणपतीला काही ठिकाणी गृत्समद असेही म्हटले आहे. 'मदस्राव करणारा हत्ती' असा या शब्दाचा अर्थ. सकल बाधांचा एकच्छत्र अधिपती व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस विघ्नाधिपती हे नाम प्राप्त झाले.
एकदन्त - एकदंतावतार हा ब्रह्माधारक असून तो मदासुराचा वध करणारा आहे. त्याचे वाहन मूषक आहे.
गणपती म्हणजे गणाचा स्वामी. धड मानवाचे व शिर हत्तीचे असा हा एक विचित्र व वैशिष्ट्यपूर्ण देव.
गणपत्यथर्वशीर्षात गणपतीला 'नमो व्रातपतये' असे नमन केले आहे. व्रातपती म्हणजे व्रात्यांचा पती.
कश्यप व अदिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला.
लम्बोदर - लंबोदराचा अवतार हा क्रोधासुराचा विनाश करणारा आहे. लम्बोदर शब्दांचा अर्थ मोठे उदर (पोट) असणारा .
धुम्रवर्ण अवतार अभिमानासुराचा नाश करणारा आहे. तो शिवब्रह्म स्वरूप आहे. त्याला मूषक वाहन असेही म्हटले जाते.
गणपतीने ब्राम्हणाच्या वेशात येऊन बल्लाळला दर्शन दिले. तेव्हापासून येथील गणपती बल्लाळेश्वर नावाने प्रसिध्द झाला.
वक्रतुण्ड म्हणजे ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव.
डोक्यावर चंद्र, तिसरा डोळा व नागभूषणे ही शिवाची वैशिष्ट्ये होत. ही तीनही गणेशमूर्तीतही आढळतात. गणेशाला भालचंद्र असे नाव आहे.