Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यंदाचा सल्लूचा गणपती

यंदाचा सल्लूचा गणपती

वेबदुनिया

PR
अभिनेता सलमान खानच्या वांद्र येथील घरी यंदा गणरायाचे आगमन होणार नाही. गेली ११ वर्षे सलमानची बहीण अर्पिता वांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणरायाचे स्वागत करायची. मात्र यावर्षी वांद्र्याच्या घरी रिन्युवेशन होत असल्यामुळे आणि ते काम वेळेत पार पडत नसल्यामुळे येथे गणरायाला आणले जाणार नाही. वांद्रा ऐवजी सलमानच्या रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या फार्महाऊसवर गणरायाचे आगमन होणार असल्याचे म्हटले जातेय. याचा निर्णय लवकरच सलमानची पूर्ण फॅमिली एकत्रित घेणार असल्याचे त्यांच्याकडूनच सांगण्यात आले आहे. तसंच यंदाच्या गणपतीची मूर्ती ही इको फ्रेन्डली असणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi