Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असा आहे बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य वेळ

असा आहे बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी योग्य वेळ
, बुधवार, 12 सप्टेंबर 2018 (10:57 IST)
घरोघरी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी आता पूर्ण होत आली आहे. गुरुवार १३ सप्टेंबर रोजी बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. या दिवशी सकाळी ११.२१ पासून दुपारी १.४८ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. या वेळेत गणेशपूजन करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे १३ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी ६.४२ पर्यंत गणेशपूजन करण्यास हरकत नाही, असे पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
 
ज्येष्ठा गौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात ज्येष्ठागौरींचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. यावर्षी शनिवार १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर अनुराधा नक्षत्र आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण दिवस कधीही गौरी आणाव्यात.
 
रविवार १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र आहे. त्यामुळे रविवारी कधीही ज्येष्ठा गौरी पूजन करावे. सोमवार १७ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर मूळ नक्षत्र आहे. त्यामुळे सोमवारी कधीही ज्येष्ठागौरींचे विसर्जन करण्यास हरकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हरतालिका विशेष : अखंड सौभाग्यप्राप्तीचे व्रत