जाशील गौराई आज तू आपल्या घरी,
जातांना घेऊन जा ग माहेरा ची शिदोरी,
कसें गेले तीन दिवस, समजले नाही,
सरबराई त तुझ्या काही कमी राहिले तर नाही?
आताशा न आई, मी पण गोंधळते ग!
करायला जाते एक, अन होते भलतेच ग !
पण मन माझे निर्मळ आहे तितकेच ,
श्रद्धेने करते सगळं, हे मात्र ही खरचं,
यावं तू दरवर्षी लेकरबाळा सवें, आपुल्या माहेरी,
सडा शिंपून ठेवीन, मखर सजवून करीन तयारी,
दे आशिष गे आई, आपुल्या लेकरास,
अधिक उण झालं असेल तर घे पदरात!
....अश्विनी थत्ते