Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विघ्नराज

विघ्नराज
, मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (14:28 IST)
भगवती पार्वती सखंबरोबर बोलताना हसल. ततून एका पुरुषाचा जन्म  झाला. पाहता पाहता तो पर्वताकार झाला. पार्वतीने तचे नाव ‘ ममतासुर’ ठेवले. त्याला गणेशाचे स्मरण करण्यास सांगितले. 
 
त्यानुसार ममतानुसार तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. तेथे त्याची शंबरासुराशी भेट झाली. त्याने ममतासुराला असुरी विद्या शिकवल्या. त्यानंतर शंबरासुराने विघ्नराज उपासनेची प्रेरणा दिली. ममतासुराची तपश्चर्या सुरू झाली. गणनाथ प्रसन्न झाले. त्यांच्याकडून ब्रह्मंडावर राज्य करण्याचा वर मिळवला.
 
त्रैलोक्यावर चढाई केली. युद्धात भगवान विष्णू आणि शिवालाही पराजित केले. संपूर्ण ब्रह्मंडावर असुराचे राज्य निर्माण झाले. देव कारागृहात बंदिस्त झाले. त्यांनी विघ्नराजाची पूजा सुरू केली. त्याने प्रसन्न होऊन भगवान प्रकटले. देवतांनी ममतासुराचा उच्छाद सांगितला. विघ्नराजने नारदामार्फत ममतासुराकडे शरण येण्याचा संदेश पाठवला. अहंकारी ममतासुराने त्याला दाद दिली नाही. तेव्हा विघ्नराज क्रोधित झाले. विघ्नराजांनी आपल्या हातातील कमळ असुरसेनेत सोडले. त्याच्या गंधाने असुर मूर्छित झाले, शक्तिहीन झाले. ममतासुर भीतीने थरथर कापू लागला. त्याने विघ्नराजाच्या चरणी लोळण घेतली, क्षमायाचना केली. त्याला अभयदान देत विघ्नराजने त्याला पाताळात पाठवून दिले. देवतागण चहूकडे विघ्नराजाचा जजकार करू लागले.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक  आणि  ट्विटर पानावर  फॉलो करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi