Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ganesh Chaturthi 2023: गणपती स्थापनेच्या दिवशी बाप्पाला मावा खिरीचा नैवेद्य द्या

Khir Recipes
, सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (15:16 IST)
गणेश चतुर्थी 2023: आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. बाजारपेठ गजबजले आहे. प्रत्येक घरोघरी गणेशोत्सवाची धूम असते. गणेशोत्सव दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवसापासून सुरू होतो.बाप्पाच्या स्थापनेनंतर दहा दिवस त्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांना निरोप दिला जातो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही भाद्र मासातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेशोत्सव सुरू होणार आहे. यंदा ही तारीख 19 सप्टेंबर रोजी येत आहे. लोक जेवढे दिवस बाप्पाला घरी आणतात तेवढेच दिवस त्याला विविध प्रकारचे खाद्य पदार्थही अर्पण करतात.या गणेशोत्सवात बाप्पाला मावा खिरीचा नैवेद्य द्या.साहित्य आणि कृती जाणून घ्या.

साहित्य
दूध - 1 लिटर
साखर - 4 चमचे
मावा - 100 ग्रॅम
बदाम, काजू, पिस्ता, – 1 वाटी
वेलची पावडर - 1/2 टीस्पून
केशर - 2 चमचे
चारोळ्या - 2 चमचे
 
कृती :
सर्वप्रथम एका भांड्यात दूध घेऊन उकळून घ्या. उकळी आल्यानंतर गॅस कमी करून मंद आचेवर शिजवा.
काही वेळाने त्यात मावा टाका आणि सतत ढवळत राहा. यानंतर दुधात चारोळ्या, बदाम, काजू, पिस्ता आणि घालून सतत ढवळत राहा.
ढवळले नाही तर ते पात्राच्या तळाशी चिकटू शकते. दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर घाला. साखर घातल्यानंतर 4-5 मिनिटे शिजवा.
साखर घातल्यावर त्यात वेलची पूड आणि भिजवलेले केशराचे धागे टाका. यानंतर, झाकण न ठेवता 20 मिनिटे शिजवा. मावा खीर तयार आहे. एका भांड्यात काढून थंड करा. वरून ड्रायफ्रूट्स घालून सजवा आणि बाप्पाला नेवेद्य द्या. 

Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणपती बद्दल माहिती